कुरआन
दिव्य कुरआन "अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे. " ★ : या अगदी खर्या घटना आहेत आणि वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाहशिवाय अन्य कोणीही ईश्वर नाही आणि ते अस्तित्व केवळ अल्लाहचेच आहे ज्याची शक्ती सर्वांपेक्षा वरचढ आहे व ज्याची बुद्धिमत्ता विश्वव्यवस्थेत कार्यरत आहे. (3:62) [8/9, 8:09 AM] : धर्म आणि राजकारण (आजचा ज्वलंत प्रश्न) इस्लाम ही एक सर्वसमावेशक अशी परिपूर्ण जीवनपध्दती आहे. याबद्दलचा खुलासा आपण मागील प्रकरणांतून पाहिला आहे. राजकारण हा धर्मकारणाचा एक भाग कसा आहे? तसेच धर्मव्यवस्थेचे राजकीय व्यवस्था एक महत्त्वाचे अंग कसे आहे? याचे अद्याप स्पष्टीकरण पूर्णतः न झाल्यामुळे लोकमनात संभ्रम आहे. या दोघांच्या संबंधाचा येथे स्पष्ट खुलासा होणे गरजेचे आहे. राजकारणाला आपण क्षुद्र समजून त्याची अवहेलना करू शकत नाही. आधुनिक जगात तर त्याचे महत्त्व इतके वाढले आहे की अतिमहत्त्वाची खाजगी कामेसुध्दा आज राजकारणाच्या कक्षेत मोडतात. त्यामुळे मनुष्यजीवनावर राजकारणाचा स्वाभाविकपणे दूरगामी परिणाम होत आहे. डोळे उघडून पाहिल्यास कळून येते की सर्व तत्त्वज्ञान, आदर्श आणि श्रध्दा...