[7/30, 6:55 स्री आणि निसर्ग नियम
अल्लाहने सर्व प्राण्यांप्रमाणे मनुष्याचीसुद्धा ‘जोडी’ बनविली. त्यांना एकमेकासाठी स्वाभाविक ओढ असते. दुसर्या प्राण्यांच्या अभ्यासावरून असे कळते की, त्यांच्यात यास जातीय (नर-मादीसंबंधी) विभाजनाचे व या स्वाभाविक आकर्षणाचे ध्येय फक्त विशिष्ट जातीचे अस्तित्व टिकवणे आहे. म्हणूनच त्यांच्यात हे आकर्षण फक्त तितकेच ठेवले गेले आहे, जितके प्रत्येक जात टिकून राहण्यासाठी आवश्यक आहे. त्यांच्या स्वभावात अशी नियंत्रणशक्ती ठेवली गेली आहे, जी त्यांना कामसंबंधात त्या ठराविक मर्यादेचे उल्लंघन करू देत नाही. या उलट माणसांत ही अभिरुचि असीमित, अनियंत्रित आणि सर्व इतर प्राण्यांपेक्षा अधिक आहे. त्यांच्यासाठी वेळ आणि काळाचे कोणतेही बंधन नाही. त्यांच्या स्वभावात अशी कोणतीही नियंत्रणशक्तीसुद्धा नाही जी त्याला एका विशिष्ट मर्यादेवर मज्जाव करील. पुरुष व स्त्रीमध्ये एकमेकासाठी स्थायी आकर्षण असते. त्यांच्यात एकमेकाला आकर्षित करण्याचे अपरिमित साधने एकत्रित केली गेली आहेत. त्यांच्या हृदयात विरूद्ध लिग-जातीबद्दल प्रेम व अनुरक्ततेची एक प्रबळ प्रेरणा ठेवली गेली आहे. त्यांच्या शरीराची रचना आणि त्याचा डौलदारपणा, रंग-रूप आणि त्याचा स्पर्श व त्याच्या अंग-प्रत्यांगात विरुद्ध लिग-जातीसाठी आकर्षण उत्पन्न केले गेले आहे. त्यांचा आवाज, गती, चाल प्रत्येक गोष्टीत आकर्षित करण्याची शक्ती भरली गेली आहे. सभोवतालच्या जगातसुद्धा असली असंख्य साधने निर्माण केली गेली आहे जी दोघांच्या लैंगिक प्रेरणांना गतिमान करतात आणि त्यांना एकमेकाकडे जाण्यास प्रवृत्त करतात. वार्याचे घोंगावणे, पाण्याचा प्रवाह, गवताची हिरवळ, फुलांचा सुगंध, चिमण्यांची चिवचिव, आकाशातील मेघ, चांदण्या रात्रीचे माधुर्यः तात्पर्य असे की, निसर्गाच्या सौंदर्याची लोभनीय शैली आणि ब्रह्मांडाच्या सौदर्याचे चित्र प्रत्यक्ष अथवा परोक्ष रूपाने त्या प्रेरणा गतिमान करण्यास कारणीभूत ठरतात.
याशिवाय माणसाच्या शारीरिक व्यवस्थेचे निरीक्षण केल्यास कळते की यात जो शक्तीचा मोठा खजिना ठेवला गेला आहे, त्यात एकाच वेळी जीवनशक्ती आणि कार्यशक्तीसुद्धा आहे व कामसंबंधी शक्तीसुद्धा. याच ग्रंथी ज्या त्याच्या अवयवांना जीवनरस देतात आणि त्यात स्फूर्ती, सामर्थ्य, बुद्धिमत्ता व कार्यक्षमता उत्पन्न करतात.त्यांनाच ही सेवादेखील सूपुर्द केली गेली आहे की, त्यांनी त्यात कामविषयक शक्तीदेखील उत्पन्न करावी. या शक्तीला गतिमान बनविणार्या भावनांचा विकास करावा. या भावना उत्तेजित करण्यासाठी सौदर्य, रूप, आकर्षकता आणि शोभेच्या विविध साधनांना एकत्र करावे आणि या साधनांतून प्रवाहित होण्याची क्षमता त्याचे डोळे, त्याचे कान आणि त्याच्या घ्राणेंद्रियात व स्पशोंद्रियात, येथपावेतो की त्याच्या कल्पनाशक्तीतसुद्धा एकत्र करावे. निसर्गाची हीच कार्यशक्ती मनुष्याच्या मानसिक शक्तीमध्येसुद्धा आढळते. त्याच्या मनात जितक्या प्रेरक शक्ती आढळतात, त्या सर्वांचा संबंध दोन प्रबळ संकल्पांशी असतो. एक तो संकल्प जो त्याला आपल्या स्वतःच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी व आपल्या स्वतःच्या सेवेसाठी तत्पर करतो. दुसरा तो संकल्प जो आपल्या विरुद्ध लिग-जातीशी संबंध ठेवण्यास भाग पाडतो. तारुण्यात जेव्हा मनुष्याची कार्यकारी शक्ती आपल्या चरमसीमेवर असते, तेव्हा दुसरा संकल्प इतका प्रबळ असतो की कधीकधी तो पहिल्या संकल्पाला दाबून टाकतो आणि मनुष्य त्याच्या इतका आहारी जातो की त्याला आपले प्राणसुद्धा गमवावे लागते. स्वतःला विनाशाच्या गतेंत समजून-उमजून ढकलण्यास त्याला यत्किंचितसुद्धा लाज वाटत नाही.
संस्कृतीरचनेवर याचा परिणाम-हे सर्वकाही कशासाठी आहे? केवळ विशिष्ट जातीच्या अस्तित्वासाठी हे आहे काय? नाही कारण मानवजातीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तितक्या प्रमाणात संततीच्या उत्पत्तीचीसुद्धा गरज नाही. जितकी मासे, शेळ्यासारख्या अन्य प्राण्यांसाठी आहे. मग याचे काय कारण आहे की, निसर्गाने अन्य प्राण्यांपेक्षा अधिक विरुद्ध लिग-जातीचे आकर्षण माणसात ठेवले आहे आणि त्यासाठी सर्वांत जास्त उत्तेजित करणारी साधने उपलब्ध करून दिली आहेत? ते केवळ माणसाच्या भोग-विलास आणि रसास्वादनासाठी आहेत काय? असेही नाही निसर्गाने कोठेही मनोरंजन आणि रसास्वादनाला उद्दिष्ट बनविलेले नाही. हे तर मनुष्य व अन्य प्राण्यांना एखाद्या महान उद्देशाच्या सेवेसाठी भाग पाडण्याकरिता स्वाद व रसास्वाद तोंडलावणी म्हणून देत असतो. आता विचार करा की, या बाबतीत कोणता महान उद्देश निसर्गासमोर आहे? आपण जितका विचार कराल, एखादे अन्य कारण याशिवाय आपल्या लक्षात येणार नाही की निसर्ग, अन्य प्राण्यांच्या उलट मानवजातीला सभ्य व सुशील बनवू इच्छितो. म्हणूनच मानवाच्या हृदयात विरुद्ध लिगासाठी प्रेम व ममतेचा तो संकल्प ठेवला गेलाआहे जो केवळ शरीरसंबंध व सन्तानोत्पत्ती क्रियेचीच निकड दर्शवितो असे नव्हे, तर एक टिकाऊ साहचर्य, हार्दिक संबंध व आध्यात्मिक जवळिकीची निकडदेखील भासवितो.
म्हणूनच माणसात विरुद्ध लिग-जातीविषयी आकर्षण, त्याच्या यथार्थ काम-शक्तीपेक्षा कितीतरी अधिक ठेवले गेले आहे. जर त्याच प्रमाणात, नव्हे तर एकास-दहाच्या प्रमाणात त्याने संततीला जन्म दिला, तर त्याचे आरोग्य बिघडेल आणि दीर्घ आयुष्याला पोहचेपर्यंत त्याची शारीरिक शक्ती संपुष्टात येईल. या गोष्टीचे हे उघड प्रमाण आहे की, मनुष्य परलिग-जातीच्या आकर्षणाच्या आधिक्याचा अर्थ असा नाही की, त्याने अन्य प्राण्यांपेक्षा अधिक संभोग करावा, तर याचा अर्थ असा आहे की, स्त्री व पुरुषाची एकमेकाशी बांधिलकी असावी आणि त्यांच्या पारस्परिक संबंधात स्थायित्व व दृढता उत्पन्न केली जावी.म्हणूनच स्त्री-स्वभावातस जातीय आकर्षण व काम-वासनेबरोबरच लज्जा, संकोच, नकार, पलायन व मज्जावासारखे गुण ठेवले गेले आहेत; जे कमी-अधिक प्रमाणात प्रत्येक स्त्रीमध्ये आढळतात. ही संकोच व पलायनची प्रवृत्ती जरी अन्य प्राण्यांच्या माद्यांमध्येसुद्धा दिसून येते. तरी मानवाच्या नारीजातीत याची शक्ती आणि प्रमाण फार अधिक आढळते आणि ती लज्जा व संकोच्याच्या भावनेद्वारा अधिक तीव्र केली गेली आहे. यावरूनसुद्धा कळते की, मनुष्यात जातीय आकर्षणाचे ध्येय हा एक स्थायी संबंध आहे. असे नव्हे की, प्रत्येक जातीय आकर्षण केवळ मैथुन-क्रियेचा परिणाम आहे. म्हणूनच मनुष्याच्या अपत्याला सर्व अपत्यांपेक्षा अधिक निर्बल व विवश निर्माण केले गेले आहे. अन्य प्राण्यांच्या उलट मनुष्याच्या अपत्याला अनेक वर्षांपर्यंत आई-वडिलांच्या संरक्षण व देखरेखीची गरज असते आणि त्यात आपल्या स्वतःला सांभाळण्याची व स्वबळावर जगण्याची क्षमता फार उशीरा येते. याचा अर्थ असा आहे की, स्त्री-पुरुषाचे संबंध केवळ लैंगिक संबंधापर्यंत मर्यादित राहू नयेत, तर या संबंधाच्या परिणामाने त्यांना परस्पर सहयोग व सहकार्यास भाग पाडावे. म्हणूनच मानवाच्या हृदयात इतर सर्व प्राण्यांपेक्षा आपल्या संततीबद्दल अधिक प्रेम ठेवले गेले आहे. अन्य प्राणी काही दिवसांपर्यंत आपल्या संततीची देखरेख केल्यानंतर त्यांच्यापासून वेगळे होतात; मग त्यांच्यात कोणताही संबंध उरत नाही. नंतर ते एकमेकांना ओळखतसुद्धा नाहीत. या उलट मनुष्य प्रारंभिक पालनपोषण काळ निघून गेला तरी संततीच्या प्रेमपाशात जखडलेला राहतो; येथपावेतो की हे प्रेम संततीच्या संततीपर्यंत चालत राहते. माणसाची स्वार्थपरक पशुतासुद्धा या प्रेमाच्या अधीन इतकी राहते की, जे काही तो केवळ स्वतःसाठी इच्छितो त्यापेक्षा कितीतरी अधिक तो आपल्या संततीसाठीइच्छितो. त्याच्या हृदयात आतून ही इच्छा उत्पन्न होते की, जितकी शक्त होईल तितकी उत्तमोत्तम सामुग्री आपल्या संततीसाठी एकत्रित करावी आणि आपल्या परिश्रमाचे फळ त्यांच्यासाठी सोडून जावे. ही तीव्र प्रेमभावना उत्पन्न करण्यात निसर्गाचे ध्येय केवळ असेच असू शकेल की, स्त्री व पुरुषाच्या लैंगिक संबंधांना एक स्थायी संबंधात परिवर्तीत करावे आणि त्या स्थायी संबंधाला कुटुंबव्यवस्थेचे साधन बनवावे. शिवाय नातेसंबंधाने प्रेमाच्या माध्यमाने अनेक कुटुंबांना विवाहसंबंधाद्वारे परस्परांना जोडत जावे. याशिवाय प्रेम व प्रियजनांच्या संयोगामुळे त्यांच्यात सहयोग व सहकार्याचा संबंध उत्पन्न करावा आणि अशा प्रकारे एक संस्कृतीव्यवस्था अस्तित्वात यावी.
संस्कृतीची मूळ समस्या-यावरून असे कळते की, हे सजातीय आकर्षण मानवी शरीराच्या रक्तात आणि त्यांच्या हृदयाच्या कानकोपर्यात वसलेले आहे. त्याच्या सहाय्यासाठी प्रचंड प्रमाणात सृष्टीच्या कणाकणात साधने व प्रेरणा एकत्रित केल्या गेल्या आहेत. त्यामागील उद्देश असा आहे की, मनुष्याच्या वैयक्तिकतेला सामाजिकतेकडे प्रवृत्त करावे. निसर्गाने या आकर्षणाला मानव-संस्कृतीची मूळ प्रेरकशक्ती बनविले आहे. याच मोहकता व आकर्षणाद्वारे मानवाच्या दोन जातीत (स्त्री-पुरुष) आपुलकी उत्पन्न होते आणि नंतर या आपुलकी व जवळिकीने सामाजिक जीवनाचा प्रारंभ होतो. जेव्हा हे सिद्ध झाले. तेव्हा हेसुद्धा आपोआप स्पष्ट झाले की, स्त्री-पुरुषाच्या संबंधांची समस्या वास्तविकतः संस्कृतीची मूळ समस्या आहे. तिच्याच अचूक सोडवणुकीवर संस्कृतीची सुधारणा व बिघाड, तिचा उत्कर्ष व अपकर्ष आणि तिचे स्थैर्य व अस्थिरता अवलंबून आहे. मानवजातीच्या या दोन्ही भागांत एक संबंध पाश्चिक (अथवा दुसर्या शब्दांत विशुद्ध लैंगिक आणि कामवासनायुक्त) आहे, ज्याचा उद्देश मानवजात अस्तित्वात ठेवण्याव्यतिरिक्त काहीही नाही आणि दुसरा संबंध मनुष्यतेचा आहे, ज्याचे ध्येय असे आहे की, दोघांनी (स्त्री-पुरुष) मिळून संयुक्त स्वार्थासाठी आपापल्या योग्यता व आपापल्या नैसर्गिक क्षमतेनुसार काम करावे. या सहयोगासाठी त्यांचा सजातीय प्रेमसंबंध एखाद्या सूत्राची भूमिका वठवितो. ते पाश्विक व मनुष्यतेचे असे दोन्ही गुण मिळून एकाच वेळी त्यांच्याकडून संस्कृतीचा कारभार चालविण्याची सेवा करून घेतात. हा कारभार चालू ठेवण्यासाठी आणखी अधिकाधिक व्यक्तींना एकत्रित करण्याची सेवासुद्धा संस्कृतीची जडणघडण व बिघाड यावर अवलंबून आहे की, या दोन्ही गुणांचे सामंजस्य अत्यंत संतुलित व अत्यंत योग्य असावे.
[7/31, 5:32 AM]
📗दिव्य कुरआन📗●●●●●●*
"अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे. "
: (आज हे ऐहिक जीवनात मस्त आहेत) आणि ज्या दिवशी अल्लाह यांना एकत्र करील तेव्हा (हेच ऐहिक जीवन यांना असे वाटू लागेल) जणू हे केवळ एक घटकाभर आपापसात ओळख करून घेण्यासाठी थांबले होते. (त्या प्रसंगी सत्यता पटेल की) खरोखरी भयंकर तोट्यात आले ते लोक ज्यांनी अल्लाहच्या भेटीला खोटे ठरविले आणि मुळीच ते सरळ मार्गावर नव्हते. (10:45)
via Quran For All
http://tinyurl.com/quranforall
[7/31, 6:45 AM] ji AA
प्रेषित्व परंपरेचा संक्षिप्त इतिहास
प्रेषित परंपरेचा मानवजातीत कसा प्रारंभ झाला व विकसित व उन्नत होत होत एका शेवटच्या महान प्रेषितावर तिचा कसा शेवट झाला; हे आपण पाहू या.
आपण हे ऐकलेच असेल की ईश्वराने सर्वाआधी एका मानवाला निर्माण केले. नंतर त्या माणसापासून त्याचे युगल बनविले व त्यापासून पुढे मानवी वंशवृद्धी केली आणि अगणित शतकानुशतकांपासून ती संपूर्ण भूमीवर पसरलेली आहे. जगात जितकी माणसे जन्मली ते सर्व त्या प्राथमिक युगलचीच संतान होत. सर्व जातीधर्माचा धार्मिक व ऐतिहासिक उल्लेख या गोष्टीशी सहमत आहे की मानवजातीचा आरंभ एकाच मनुष्यापासून झाला आहे. विज्ञानाच्या संशोधनाद्वाराही हे सिद्ध झालेले नाही की भूमंडलावर निरनिराळया भागांत वेगवेगळी माणसे निर्माण केली गेली. उलट अधिकतर वैज्ञानिक विद्वानांचे असे अनुमान व मत आहे की सर्वाआधी एकच मनुष्य निर्माण झाला असेल. जेथे मानववंश आढळतो, तो त्याच एका पहिल्या मानवाची1संतान आहे.
१) हे वास्तव की संपूर्ण मानवजात एकाच माता पित्याची संतान आहे, जात पात, उच्चनीचसंबंधी भेदभावाचे समूळ उच्चाटन करते आणि सर्व एक दुसऱ्यांचे बंधु आहेत, हे सिद्ध होते. जातीयतेमुळे मानवसमाजात बिघाड निर्माण झाला आहे आणि त्याने रौद्ररूप धारण केले आहे या समस्येचे निराकरण मानवी विश्व-व्यापकतेत आहे.
आपल्या वंशजांना इस्लामी जीवनपद्धतीचे शिक्षण द्यावे. अर्थात त्यांना हे दाखवावे की तुमचा व संपूर्ण विश्वाचा निर्माता एकच ईश्वर आहे. त्याचीच तुम्ही उपासना करा. त्याच्या समोर आपले मस्तक टेका. त्याच्याशीच सहाय्याची करूणा भाका आणि त्याच्या इच्छेनुसार जगात सदाचरणाने व न्यायाने आपले जीवन व्यतीत करा. तुम्ही अशा प्रकारे आचरण केले तर तुम्हाला योग्य ईनाम (मोबदला) मिळेल. जर तुम्ही त्याची अवज्ञा कराल तर कठोर शिक्षा मिळेल.
आदरणीय आदम (अ.) यांच्या संततीपैकी जे लोक भले होते ते आपल्या पित्यांनी दाखविलेल्या सरळ मार्गाने चालत राहिले. परंतु जे लोक दुष्ट व वाईट होते त्यांनी तो मार्ग सोडून दिला. हळूहळू हरप्रकारची दुष्कृत्ये व कुश्रद्धा पसरत गेली. कोणी चंद्र, सूर्य, तारे कोणी वृक्षाची, पशूची व नद्यांची उपासना सुरू केली. काहींनी असा विचार केला की, वायू, जल, अग्नि, रोगराई तसेच आरोग्य व निसर्गाच्या इतर सत्तेचे व सामर्थ्यांचे ईश्वर वेगवेगळे आहेत. त्यापैकी प्रत्येकाची उपासना करावयास हवी ज्यायोगे ते सर्व प्रसन्न होऊन आमच्याशी दयाळू होतील. अशा तऱ्हेने अज्ञानापोटी ‘शिर्क’ (अनेकेश्वरत्व) व मूर्तीपूजेची अनेक रूपे प्रकटली आणि त्यापासून अनेक धर्म निर्माण झाले. हा तो काळ होता जेव्हा आदरणीय आदम (अ.) यांची वंशवेल जगाच्या विभिन्न भागांत पसरली होती. भिन्नभिन्न जाती बनल्या होत्या. प्रत्येक जातीने आपला एक नवीन धर्म बनविला होता आणि प्रत्येकाच्या रूढी-परंपरा वेगळ्या होत्या. ईश्वराच्या विस्मरणाबरोबरच लोकांना त्या नियमांचेही विस्मरण झाले जे आदरणीय आदम (अ.) यांनी आपल्या संततीला शिकविले होते. लोकांनी केवळ आपल्या तुच्छ इच्छावासनांचेच पालन आरंभिले. हर प्रकारच्या वाईट रूढी व प्रथा निर्माण झाल्या. सर्व प्रकारच्या अज्ञानपूर्ण विचारांचा प्रसार झाला. चांगले व वाईट जाणण्यासाठी चुका करण्यात आल्या. अनेक वाईट गोष्टींना चांगले मानण्यात आले व कित्येक चांगल्या गोष्टी वाईट ठरविल्या गेल्या.2
आता ईश्वराने प्रत्येक जातीत व वंशात, प्रेषित पाठविण्यास आरंभ केला आणि ते लोकांना त्याच इस्लामची शिकवण देऊ लागले जी शिकवण आदरणीय आदम (अ.) यांनी सर्वप्रथम माणसांना दिली होती. या प्रेषितांनी आपापल्या जातीवंशांना विसर पडलेल्या शिकवणीची आठवण करून दिली. एकाच ईश्वराची उपासना करण्याची त्यांना शिकवण दिली. ‘शिर्क’ (अनेकेश्वरत्व) व मूर्तीपूजा करण्यापासून लोकांना परावृत्त केले. अज्ञानापोटी आलेल्या रूढींचे उच्चाटन केले. ईश्वरेच्छेनुसार जीवन व्यतीत करण्याची पद्धत दाखविली. उचित नियम व आदेश दाखवून देऊन त्यांचे पालन करण्याचा आदेश दिला. भारत, चीन, इराण, इराक, इजिप्त, आफ्रिका, युरोप थोडक्यात असे की जगात कोणताही देश असा नाही जेथे ईश्वराकडून त्याचे सच्चे प्रेषितांचे आगमन झाले नाही. त्या सर्वांचा धर्म एकच होता तो हाच धर्म होता ज्याला ‘इस्लाम’ असे म्हणतात.(२) इतके जरूर होते की त्यांच्या शिकवणीची पद्धत व जीवनाचे नियम व कायदे थोडेसे भिन्न होते. ज्या तऱ्हेचे अज्ञान प्रत्येक जातीत पसरले होते, तेच दूर करण्यावर अधिक भर दिला गेला. ज्या प्रकारचे असत्य विचार प्रचलित होते त्यांच्यात सुधारणा घडवून आणण्यावरच अधिक भर दिला गेला. संस्कृती, सभ्यता, ज्ञान व बुद्धीच्या दृष्टीने सर्व जाती प्राथमिक अवस्थेतच होत्या म्हणून त्यांना सरळ व सोपी शिकवण व साधे धर्म-नियम व विधान दिले गेले. जसजशी प्रगती व उन्नती होत गेली तसतसे शिकवणीला व धर्म विधानांनाही विकसित रूप दिले गेले. परंतु हा फरक केवळ बाह्यात्कारीच होता. सर्वांचा आत्मा एकच होता. श्रद्धेत ‘तौहीद’ (एकेश्वरत्व), व्यवहारात भलेपणा व सदाचार आणि आखिरत (पारलौकिक जीवन) च्या शिक्षा व मोबदल्यावर सर्वांची श्रद्धा व दृढ विश्वास होता.
प्रेषितांशी माणसांनी विचित्र असा दुर्व्यवहार केला. पहिल्यांदा त्यांचा छळ करण्यात आला, त्यांच्या आज्ञा पाळण्यास नकार देण्यात आला. काहींना आपल्या मायभूमीतून हुसकून लावण्यात आले. काहींचा वध करण्यात आला. काहींना आयुष्यभर शिकवण व उपदेश करूनसुद्धा मोठ्या मुष्किलीने केवळ दहापाच अनुयायी प्राप्त होऊ
२) सर्वसाधारणपणे लोकांचा एक मोठा असा गैरसमज आहे की, इस्लामचा उदय आदरणीय मुहम्मद (स.) कडून झाला आहे. हा गैरसमज येथपर्यंत झालेला आहे की, आदरणीय मुहम्मद (स.) यांना इस्लामचे संस्थापक मानण्यात येते. वास्तविकपणे ही एक अत्यंत मोठी चूक असून प्रत्येक अभ्यासकाच्या मनातून ती पूर्णपणे दूर केली गेली पाहिजे. प्रत्येक अभ्यासकाने ही गोष्ट चांगली समजून घेतली पाहिजे की, अगदी आरंभापासून मानवजातीचा इस्लाम हाच एकमेव व खराखुरा धर्म आहे. पृथ्वीवर ज्या काळी व ज्या स्थळी ईश्वराकडून प्रेषित आले, त्या सर्वांनी याच एका धर्माची लोकांना शिकवण दिली. परंतु ईश्वराचे हे निवडक दास आपले कर्तव्य ठामपणे करीत राहिले. शेवटी त्यांच्या शिकवणुकीचा परिणाम घडला. मोठमोठे जाती-वंशाचे समूह त्यांचे अनुयायी बनले. त्यानंतर मार्गभ्रष्टतेने वेगळे रूप धारण केले. जगातून प्रेषितांचे प्रयाण होताच त्यांच्या अनुयायांनी त्यांना मिळालेल्या शिकवणुकीत हळूहळू बदल केला. त्यांच्यावर अवतरलेल्या ईशग्रंथात आपले विचार व मत मिसळले. उपासनांच्या निरनिराळ्या प्रकारांचा अंगीकार केला.
काहींनी तर खुद्द प्रेषितांचीच उपासना व आराधना सुरू केली. कोणी आपल्या प्रेषिताला ईश्वराचा अवतारच मानले (म्हणजे खुद्द ईश्वरच मानवी रूपात प्रकटला होता) कोणी आपल्या प्रेषिताला ईश्वराचा पुत्र मानले तर आणखी कोणी आपल्या प्रेषिताला ईशत्वाचा सहभागी मानले. अशा रितीने माणसांनी एक अद्भूत आत्मवंचनेचे कृत्य सुरू केले. ज्या व्यक्तींनी एकेश्वरत्वाची शिकवण दिली होती आणि मूर्तीपूजेचे खंडन केले होते, मनुष्याने त्यांच्याच मूर्ती बनवून त्यांचीच उपासना सुरू केली. या प्रेषितांनी जे काही नियम व आचारसंहिता आपल्या अनुयायांना दिले होते तेही तऱ्हेतऱ्हेने विकृत करण्यात आले. त्यामध्ये सर्व प्रकारच्या अज्ञानयुक्त व अडाणीपणाच्या रूढींचा समावेश करण्यात आला. मानवनिर्मित नियमांची त्यामध्ये सरमिसळ करण्यात आली, ती इतकी की कांही शतके लोटल्यानंतर हे जाणून घेण्याचे कसलेही साधनच शिल्लक उरले नाही की प्रेषितांनी दिलेली खरी शिकवण व खरी आचारसंहिता कोणती आहे व नंतर लोकांनी त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींची मिसळ व भेसळ केली.3
खुद्द प्रेषितांची जीवनचरित्रेसुद्धा आख्यायिका व दंतकथामध्ये अशा रितीने मिश्रित झालेली आहेत की, त्या बाबतीत कोणतीही गोष्ट विश्वासार्ह उरली नाही. तरीसुद्धा प्रेषितांनी केलेले प्रयत्न अगदीच व्यर्थ व वाया गेले नाहीत. मिसळ व भेसळ झाली असूनही काहीतरी मूळ सत्य अनेक धर्मात अल्पशा प्रमाणात शिल्लक उरले आहे. ईश्वराची जाणीव व पारलौकिक जीवनाची जाणीव कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सर्व धर्मांत आढळते. चांगुलपणा, सदाचार यांची काही तत्त्वे सर्व जगात मान्य केली गेली.
सर्व जातीवंशाच्या प्रेषितांनी वेगवेगळ्या तऱ्हेने अनेक जातीवंशाला इतपत तयार करून सोडले की, जगात अशा एका धर्माची शिकवण प्रसारित केली जावी की जो धर्म निस्संशयपणे व एकमुखाने सर्व मानवजातीचा धर्म असेल.
आम्ही वर म्हटल्याप्रमाणे आरंभी प्रत्येक जातीवंशात वेगवेगळे प्रेषित येत असत आणि त्यांची शिकवण त्यांच्या जातीवंशापर्यंतच मर्यादित असे. याचे कारण असे की, त्याकाळी सर्वच जाती-वंश एकमेकापासून वेगळे होते. एकमेकांत मिसळत नसत. जणू काय प्रत्येक जात व वंश आपल्या देशाच्या सीमेच्या अंतर्गत मर्यादित होती. अशा काळी कोणतीही सर्वसाधारण व एकत्रित शिक्षण, शिकवण यांचा सर्व जाती-वंशात प्रसार करणे अत्यंत कठीण होते. शिवाय भिन्न भिन्न जाती-वंशाची अवस्था एकमेकापासून खूपच वेगळी होती. अज्ञानरुपी अंधकार चहुकडे मोठ्या प्रमाणात होता. अशा अज्ञानापोटी, श्रद्धा व आचार यात जी विकृती निर्माण झाली होती, ती प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या रुपात आढळत असे. म्हणूनच ईश्वराच्या प्रेषितांनी प्रत्येक जातीवंशाला वेगळी शिकवण व उपदेश दिला. असत्य विचारांचे हळूहळू उच्चाटन करून उच्चप्रतीच्या नियम व विधानाचे पालन करण्याची शिकवण दिली जाई. अशा तऱ्हेने या जातीवंशाला शिकवण देण्यात किती हजार वर्षे लोटली ते ईश्वरालाच ठाऊक. प्रगती करता करता अखेरीस ती वेळ आली जेव्हा मानवजात बाल्यावस्थेतून निघून तारुण्यावस्थेत पोहोचू लागली होती. व्यापार, कला कौशल्य यांच्या प्रगतीबरोबरच जातीजातीत परस्पर संबंध निर्माण झाले. चीन व जपानपासून ते युरोप व आफ्रिकेतील दूरवरच्या देशांमध्ये जलमार्गाने तसेच खुष्कीच्या मार्गाने दळणवळण सुरू झाले. बहुतेक जातीवंशांत लेखन कलेचा प्रसार व प्रचार सुरु झाला. विद्या व कला यांचा प्रसार झाला. विभिन्न जातीवंशात ज्ञानाची देवाणघेवाण होऊ लागली. मोठमोठ्या राज्यांची स्थापना करून अनेक देशांना तसेच अनेक जातीवंशांना एकाच राजनैतिक व्यवस्थेमध्ये जोडून टाकले.
अशा रीतीने त्यापूर्वी मानवजातीत आढळून येणारा दुरावा व परकेपणा हळूहळू कमी होऊ लागला. त्यामुळे इस्लामची एक शिकवण व एक धर्मविधान संपूर्ण जगासाठी पाठविणे शक्य झाले. आजपासून अडीच हजार वर्षांपूर्वी मानवाची अवस्था इतकी प्रगत झाली होती की जणू तो स्वतःच एका सामान्य धर्माची मागणी करु लागला होता. बौद्धमत हा काही परिपूर्ण धर्म झालेला नव्हता व त्यात केवळ काही नैतिक नियमच होते. परंतु तो भारताबाहेर जपान व मंगोलियापर्यंत व दुसरीकडे अफगाणिस्तान व बुखारापर्यंत पसरला. त्याचे प्रचारक दूरदूरच्या देशापर्यंत जाऊन पोचले. याच्या काही शतकानंतरच ख्रिश्चन धर्माचा उदय झाला. आदरणीय ईसा (त्यांचेवर ईश्वराची कृपा असो) इस्लामचीच शिकवण घेऊन आले होते, परंतु त्यांच्या पश्चात ख्रिश्चन धर्माच्या नावाने एक अपूर्ण व दोषयुक्त धर्म रचण्यात आला. ख्रिश्चनांनी या धर्माचा प्रसार इराणपासून आफ्रिका व युरोपमधील दूरदूरच्या देशांत केला. या घटना आम्हाला हे दर्शवितात की, जग त्याकाळी एक सामान्य मानवी धर्माची मागणी करीत होते. तसे करण्यात त्याची इतकी तयारी झाली होती की, जेव्हा एक परिपूर्ण व सत्यधर्म त्याला मिळाला नाही तेव्हा त्याने अपक्व आणि अपूर्ण धर्माचाच मानवजातीत प्रसार करण्यास प्रारंभ केला.
[8/1, 5:35 AM] JKA
: *●●●●●●📗दिव्य कुरआन📗●●●●●●*

:😴 सरतेशेवटी प्रत्येकाला मृत्यू आहे आणि तुम्ही सर्वजण आपापले पुरेपूर मोबदले कयामतच्या दिवशी प्राप्त करणार आहात. यशस्वी खर्या अर्थी तोच आहे जो तेथे नरकाग्नीपासून वाचेल व स्वर्गामध्ये दाखल केला जाईल. उरले हे जग, तर ही केवळ एक भुरळ पाडणारी बाब आहे. (3:185)
via Quran For All
http://tinyurl.com/quranforall
[8/1, 6:40 AM] JAA: वर्तमान वैज्ञानिक शोध व इस्लाम
इस्लामी आंदोलन सध्याच्या नवीन शोधांच्या विरुद्ध नाही, तसेच निरनिराळ्या अवजारांवर व शस्त्रांवर ‘बिसमिल्ला हिर्रमानिर्रहीम’ ही अक्षरे लिहली जावीत अशीही कोणा मुस्लिमांची इच्छा नाही व तसे झाले नाही तर आपल्या घरात, शेतात व कारखान्यात त्यांना वापरणार नाहीत असे नाही. इस्लाम केवळ इतकेच इच्छितो की ही अवजारे व शस्त्रे अल्लाहसाठी व त्याच्या इच्छेनुसारच वापरली जावीत. कारण ही निर्जीव शस्त्रे असून त्यांना कोणताही धर्म अगर मातृभूमी असत नाही परंतु त्यांच्या गैरवापराने सर्व जगातील माणसावर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. उदाहरणार्थ, तोफ पाहा. तिला धर्म, वर्ण, मातृभूमी वगैरे काही नसते; पण कोणीही तिचा गैरवापर करुन तिच्या सहाय्याने इतरांवर जुलूम व अत्याचार करु लागावे, कोणाही मुस्लिमांचे ते कोणत्याही परिस्थितीत वैभव अगर शान नाही. उलट जुलूम व अत्याचारापासून लोकांचे रक्षण करण्यासाठी तोफेचा उपयोग करण्याचे अथवा अल्लाहच्या दीनचा (जीवन) कलिमा उंच करण्यासाठी तिचा उपयोग करणे हे मुस्लिमांचे काम ठरते.
तसेच चित्रपटाचा शोध आहे. इस्लाम चित्रपटाविरुद्ध नसून सज्जन मुस्लिमांची मागणी एवढीच आहे, की चित्रपटाचा माणसाच्या पवित्र भावनांचे, चारित्र्याचे व मानवी समाजातील भल्या-बुऱ्यातील संघर्षांचे प्रतीक म्हणून वापर व उपयोग करावा. आजचे चित्रपट नागडेपणाचे तसेच घाणेरड्या वासनांचे व खालच्या दर्जाचे आहेत. कारण त्याद्वारे मानवी जीवनाचे निकृष्ठ दर्जाचे व निरर्थक चित्रण उभारले जातो. त्यामुळे माणसातील पाशवी वासना चळविल्या जातात. अशा प्रकारचे चित्रपट माणसाला आध्यात्मिक प्रगतीत सहाय्य करु शकत नाहीत हे उघड आहे, उलट त्याला ते हानिकारकच सिद्ध होतात.
इस्लामने मानवाच्या विज्ञान शोधांना कधीही विरोध केलेला नाही. सर्व चांगल्या विज्ञान शोधांचा उपयोग आपल्या उद्देशाकरिता करण्याची त्याने मुस्लिमांना शिकवण दिली आहे. इस्लामचे प्रेषित मुहम्मद (स) यांचे असे सांगणे आहे,
‘ज्ञान प्राप्त करणे हे प्रत्येक मुस्लिमाचे अनिवार्य कर्तव्य आहे.’
ज्ञानाच्या व्याख्येत सर्व प्रकारच्या ज्ञानाचा समावेश असतो, हे येथे सांगण्याची कदाचित गरज नाही, जणू प्रेषित मुहम्मद (स) यांना असे अभिप्रेत होते, की मुस्लिमांनी ज्ञानाच्या व विज्ञानाच्या सर्व क्षेत्रांत पुढे गेले पाहिजे.
तात्पर्य असे की मानवतेची सेवा करणाऱ्या कोणत्याही संस्कृतीचा इस्लाम विरोध करीत नाही. पण जर एखाद्या संस्कृतीने मदिरापान, जुगार, नैतिक अधःपतन, वेश्यावृत्ती तसेच वसाहतवादी साम्राज्याला कोणत्या ना कोणत्या सबबीवर इतरांना गुलाम बनविण्याचा पर्याय होण्याचे ठरविले तर इस्लाम अशा संस्कृतीचा स्वीकार करीत नाही. उलट तिच्याविरुद्ध तो आवाज उठवितो. जेणेकरुन तिने आणलेल्या सर्वनाशापासून व रोगराईपासून लोकांचे रक्षण व्हावे.
[8/2, 5:38 AM] JKA
*●●●●●●📗दिव्य कुरआन📗●●●●●●*

: लोकांकरिता वासनाप्रिय गोष्टी,- स्त्रिया, संतती, सोन्या-चांदीचे ढीग, निवडक घोडे, पशू आणि शेतजमिनी- अत्यंत मोहक बनविल्या गेल्या आहेत, पण या सर्व वस्तू तर क्षणिक ऐहिक जीवनाची सामग्री आहे. खरे पाहता जे सर्वोत्तम ठिकाण आहे, ते अल्लाहजवळ आहे. 😴 (3:14)
via Quran For All
http://tinyurl.com/quranforall
[8/2, 6:39 AM] JAA
‘जिहाद’ : व्याख्या आणि गरज
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या काळातील लढायांचा उल्लेख पाहून काही इतिहासपंडितांकडून होणार्या टीकांच्या आधारावर असा नेहमीच प्रश्न उभा करण्यात येतो की, नैतिकता आणि शांतीचा संदेश देणार्या धर्मात तलवारीची आणि युद्धाची काय गरज आहे? मस्जिदीसह रणभूमीतील कार्याची जोड कशासाठी? कारण धर्म, नीतिमत्ता, पूजापाठ, समाजकार्य वगैरे सर्व काही मस्जिदीमधून होऊ शकते. ‘रणभूमी’चा या बाबीशी काय संबंध आहे?
या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर स्वयं कुरआनने दिले आहे. प्रथम असे की, इस्लामी राज्याचे अस्तित्व व अधिकार, तेथील निवासी आणि संपत्तीचे संरक्षण करणे हे रणभूमी गाजविल्याशिवाय शक्य नाही.
दुसरे असे की, मानवाची श्रद्धा, लक्ष्य, जीवनव्यवस्था आणि सांस्कृतिक रुपरेखा अबाधित ठेवण्यासाठी इस्लामी राज्याचे गठन व्हावे.
तिसरे असे की, ईशदासत्वावर आधारित आणि मानवकल्याण आंदोलनविरोधी असलेल्या विध्वंसक शक्तींचा विनाश व्हावा.
चौथे असे की, जर एखाद्या अत्याचारी आणि जुलमी शक्तीद्वारे दीनदलित मानव, अबला स्त्रिया आणि आबालवृद्ध सतत अत्याचार व अन्यायाच्या भट्टीत होरपळत असतील, त्यांना सुधारणा, विकास, सफलता व समृद्धीपासून हेतुपुरस्पर रोखण्यात येत असेल, तेव्हा अशा विध्वंसकारी शक्तींना मुळासकट उपटून काढण्यात यावे.
‘जिहाद’च्या या पवित्र धारणात्मक क्षेत्रात प्रतिरक्षात्मक युद्धदेखील आलेच. परंतु हे विसरता कामा नये की आंदोलन आणि सभ्यतांची प्रत्येक लढाई ही एकप्रकारे प्रतिरक्षात्मक लढाई असते आणि दुसर्याप्रकारे अक्रामक, मात्र त्याचबरोबर ती सुधारात्मक आणि रचनात्मकसुद्धा असते.
जिहादच्या या धारणेनुसार आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) आणि त्यांच्या अनुयायाचे त्यांच्या विरोधकांशी असे वर्तन होते की, जणू एखाद्या पडीक शेतीस तयार करून त्यात बगीचा लावू इच्छीतात. परंतु काही जंगली पशु, त्यांनी तयार केलेली शेती वारंवार खराब करतात आणि मग जेव्हा त्या बगीच्यात सुंदर फुले लागतात तेव्हा एक एक फूलझाड उपटून नष्ट करतात. मग या जंगली पशुंना कोणत्या नियम आणि नैतिक आधारानुसार स्वैराचार करण्यासाठी मोकळे रान सोडण्यात यावे? यासाठी कोणत्या नैतिक नियमांचा आधार घ्यावा? ‘अरब’मध्ये दोन शक्ती समोरासमोर होत्या. एकीकडे विधिवृत सुव्यवस्थित राज्य होते. या राज्यात स्वच्छ आणि शालीन समाज वावरत होता. हे राज्य संपूर्ण जगासाठी एक सफल संदेशाचा ध्वजधारी होता. दुसरीकडे अनेकेश्वरवादाच्या विवेकहीन आणि अमानवी धारणा व श्रद्धा होत्या. प्रत्येक कबिल्याची वेगळी विचारधारा आणि स्वरुप होते. नैतिक स्तर पतनग्रस्त होत्या. एक जुनाट गंजलेली सभ्यता आणि संस्कृती होती. या संस्कृतीत कोणताही प्रवाह नसून जमलेल्या पाण्याप्रमाणे ती सडत होती.
मक्का आणि मदीना दरम्यानचे युद्ध हे गृहयुद्ध स्वरुपाचे होते. हे युद्धक्रांती घडवून आणणार्या शक्तीविरुद्ध क्रांतीविरोधी शक्तींनी सुरु केले होते.
बद्रच्या पहिल्या युद्धाची पृष्ठभूमी अशी होती की, ‘हिजरत’ (स्थलांतर) च्या वेळी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्याविरुद्ध कुरैशजणांनी त्यांच्या हत्येचे भ्याड षडयंत्र रचले होते आणि ‘हिजरत’ च्या रात्री मक्काच्या गल्लोगल्ली तलवारी म्यानाच्या बाहेर आल्या होत्या. ‘अकबा’च्या ठिकाणी मदीनावासी ज्या वेळी प्रेषितांच्या हातावर इस्लामची दीक्षा घेत होते, तेव्हाच त्यांना हे सत्य कळून चुकले होते की, प्रेषितांना मदीनास येण्याचे निमंत्रण देणे म्हणजेच मक्काच्या क्रूर सरदारांचे वैर घेणे आणि युद्धास सामोरे जाणे होय. मक्कावासीयांनी तर अब्दुल्लाह बिन उबईच्या मार्फत मदीनावासीयांना गुपित पत्रसुद्धा दिले होते की, ‘‘तुम्ही स्वतः प्रेषित मुहम्मद(स) यांना शहराबाहेर काढून टाका, अन्यथा आम्ही तुमच्यावर हल्ला करून तुम्हाला ठार करून आणि तुमच्या पत्नी आणि मुली व बहिणींना आपल्या भोगविलासाचे साधन बनवू.’’ मग प्रत्यक्षात आणखीन एक संदेश मुस्लिमांना पाठविण्यात आला की, ‘‘असे समजू नका की, मक्का शहरातून सुरक्षित निसटल्याने आम्ही तुम्हास सोडून दिले. मदीना पोहोचून आम्ही नक्कीच तुमचा समाचार घेऊ.’’
त्याच काळात माननीय साद बिन मआज(र) यांना ‘अबुजहल’ या ईशद्रोह्याने प्रवेश करू दिला नाही आणि म्हणाला, ‘‘तुम्ही लोकांचा काबागृहात प्रवेश करणे आम्हाला मुळीच खपत नाही.’’ यावर माननीय साद बिन मआज(र) यांनीदेखील त्यास खडसावले की, ‘‘ठीक आहे, तुम्ही आम्हास काबागृहांचा मार्ग बंद केला तर आम्ही तुमचा व्यापारिक राजमार्ग बंद करू!’’
या सर्व घटनांच्या कड्या जोडून पाहिल्यास ही गोष्ट स्पष्ट होते की, मक्कावासीयांकडूनच सुरुवातीस युद्धाची घोषणा करण्यात आली. कुरैशजणांना आपली तलवार म्यानाबाहेर काढण्यासाठी काही कारणास्तव उशीर झाला खरा, अन्यथा हे कुकर्म त्यांनी खूप अगोदरच केले असते. त्यांच्यासमोर एक मोठी अडचन ही ‘किनाना’ परिवाराची होती. किनाना परिवार मक्का आणि मदीनाच्या मध्यात होता. किनाना परिवाराचे कुरैश परिवाराशी जुने हाडवैर होते. मदीनावर चढाई करण्यासाठी ‘किनाना’ प्रदेशातूनच जाणे भाग होते. कारण हाच एकमेव मार्ग मदीनास जाण्यासाठी होता. जुने वैर असल्याने कुरैशजणांना या मार्गावर किनानाजणांकडून अडविले जाण्याची भीती वाटत होती. त्याचबरोबर असा धोका संभावण्याचीदेखील भीती होती की, कुरैशजणांनी मदीनावर चढाई केली तर किनाना परिवाराचे लोक मागून येऊन मक्का शहरावर चढाई करतील किवा कुरैशजणांचा मक्का शहराशी असलेला मार्ग बंद करतील. ‘सुराका बिन मालिक’ हा किनाना परीवाराचा सरदार होता. त्याला जेव्हा परिस्थितीची जाणीव झाली, तेव्हा तो स्वतः मक्का शहरी गेला आणि तेथील इस्लामद्रोही सरदारांना सहाय्य करण्याचे अश्वासन दिले.
मक्कावासीयांची दुसरी समस्या ही योद्ध्यांना संघटित करण्याची होती. यासाठी हे ठरविण्यात आले की, हे प्रकरण ‘अहाबिश’च्या स्वाधीन करावे. कारण ते अत्यंत शूर आणि रागीट व संतापी स्वभावाचा होता. सुपारी घेऊन युद्ध करण्याचादेखील त्याचा व्यवसायच होता. त्यांनी मक्काच्या जवळ असलेल्या ‘अल अहाबिश’ नावाच्या खाडी प्रदेशात मक्कावासीयांबरोबर मैत्रीचादेखील करार केला होता.
तिसरी समस्या ही आर्थिक समस्या होती. म्हणून जो व्यावसायिक काफिला या वर्षी ‘सीरिया’ देशी चालला होता, त्यास मक्कावासीयांनी जास्तीतजास्त भांडवल गोळा करून दिले होते, जेणेकरून या व्यवसायातून मिळणार्या भरघोस नफ्याचा प्रचंड पैसा मदीनावर हल्ला चढविण्यासाठी कामी येईल.
खर्या अर्थाने विचार केल्यास हा काफिला व्यवसायिक नसून त्यातून कमाविलेल्या नफ्याचे प्रत्येक नाणे हे मुस्लिमांचे रक्त सांडण्यासाठी भाल्याचा फाळ आणि तलवारीची तीक्ष्ण धार होती. जगाच्या पाठीवरील कोणतेही राज्य आजही आपल्या प्रभावसीमांमध्ये अशा प्रकारच्या कारवायांची उघड सूट कोणत्याही शत्रूक्तीस देत नाही. इस्लामद्वेष्ट्या कुरैशच्या व्यावसायिक काफिल्याविरुद्ध मुस्लिमांकडून जी कार्यवाही सुरु करण्यात आली होती तिचा उद्देश हा होता की, ‘कुरैश’ परिवाराची व्यापाराच्या आडची युद्धाची मोहीम अशसस्वी व्हावी.
या ठिकाणी थांबून आपण मागे घडलेल्या एका घटनेचा अढावा घेऊ या. ‘नखला’कडे प्रेषितांनी पाठविलेल्या एका तुकडीची कुरैश कबिल्याच्या काहीजणांशी झडप झाली आणि त्यात कुरैशांचा एक माणूस ठार झाला. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना या घटनेचे दुःख झाले. कारण इस्लामी शासनाकडून अद्याप अशा कार्यवाहीचा आदेश जारी झालेला नव्हता. प्रेषितांनी ठार झालेल्या माणसाच्या हत्येचा मोबदला कुरैशपरिवारास पाठवून घडलेल्या दुःखद घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. प्रेषितांनी हत्येचा मोबदला देऊनसुद्धा मक्का शहरात प्रेषितविरोधी भावना उफाळल्या आणि ही संधी साधून मक्कावाल्यांनी संपूर्ण मक्का शहराचे वातावरण गढूळ केले. संयोगाची बाब ही की मुस्लिम लष्कर तुकडीस ही गोष्ट माहीत नव्हती की, याच दिवसापासून माहे ‘हराम’ (शांतीमास) सुरु होत आहे. या महिन्यात कोणावरही चढाई वा हल्ला करणे संपूर्ण अरबच्या परंपरेविरुद्ध होते, ही गोष्टसुद्धा विरोधकांच्या प्रचाराचे साधन बनली आणि याच घटनेस कुरैशजणांनी लढाईसाठी पाऊल उचलण्याचे निमित्त बनविले.
परिस्थिती विचित्र होती. पवित्र रमजानचा पहिला महिना होता आणि रोजे (महिनाभराचे उपवास) आनिवार्य झाले होते. याच महिन्यात सत्य आणि असत्याची पहिली लढाई झाली आणि सत्यास विजय मिळाला. असत्य पराभूत झाले.
कुरआन अवतरित झालेल्या या महिन्यास ईश्वराने ईशपरायणता आणि प्रशिक्षणाचे साधन बनविले. या ईशपरायणता आणि प्रशिक्षणाशिवाय इस्लामी जिहादच्या बाबतीत कल्पना करणेच शक्य नाही.
प्रशिक्षणाचा हा महिना श्रद्धावंतांसाठी एक मोठी परीक्षाच असते. रमजान महिना हा या गोष्टीची कसोटी असतो की, जगामध्ये सत्य प्रस्थापना करणारे आणि असत्याचे निर्मूलन करणारे वीर क्रांतिकारी कर्तव्य पूर्ण करण्यासाठी पुढे येताहेत की नाही. त्यांचा आपल्या मनोकामना आणि अभिलाषांवर ताबा आहे की तेच आपल्या मनोकामना आणि अभिलाषांचे दास व गुलाम आहेत? जर त्यांचा ताबा नसेल तर उत्तुंग हेतु आणि उद्देशांचे केवळ नारे तर कोणीही लावू शकतो, परंतु निर्णायक बाब अशी की, त्याग आणि संकटे झेलण्याचे सामर्थ्य त्याच्यात आहे काय? ‘रमजान’हा पवित्र महिना ईश्वरी सैन्यास असा जिहाद करणार्यांना तयार करण्याची कसोटी आहे, जे भूक, तहान सहन करून आणि इतरांची निदानालस्तीसारख्या दुष्कृत्यापासून दूर राहून ईश्वरी आदेशाचे पालन करावे. नसता एखादा माणूस खाण्यापिण्यावरील काही तासांचे बंधन सहन करु शकत नाही. दांपत्यिक सुख काही काळापुरते त्यागू शकत नाही आणि मग तो जर इस्लामची सेवा, इस्लामी क्रांती आणि इस्लामी स्वरुपाच्या गप्पा मारत असेल, तर या निव्वळ गप्पाच असतील. यामुळे कोणाचे आणि स्वतःचेही भले होणार नाही. जगावर अशा लोकांनाच विजय मिळविता येतो, जे दुसर्यांशी लढण्यापूर्वी स्वतःशी लढून स्वतःवर विजय प्राप्त करतात.पवित्र आणि मंगलमय रमजान महिन्यात मुस्लिम मुजाहिदीन (धर्मयोद्धे) प्रथमच प्रेषित मुहम्मद(स) यांच्या नेतृत्वात जिहादच्या मार्गावर पाऊल टाकतात.
www.islamdarshan.org
[8/3, 6:05 AM] JKA

: त्यांना सांगा! यापेक्षा अधिक चांगली वस्तू काय आहे, ते सांगू? जे लोक अल्लाहच्या कोपाचे भय बाळगून वागतील, त्यांच्यासाठी त्यांच्या पालनकर्त्याजवळ उद्याने आहेत ज्यांच्याखालून कालवे वाहत असतील, तेथे त्यांना चिरकालीन जीवन प्राप्त होईल. पवित्र पत्नीं त्यांच्या सोबती असतील आणि त्या अल्लाहच्या प्रसन्नतेने मान्यवर होतील. अल्लाह आपल्या दासांच्या वागणुकीवर देखरेख ठेवतो. (3:15)
: हे ते लोक आहेत जे म्हणतात की, ’’हे स्वामी, आम्ही श्रद्धा ठेवतो आमच्या अपराधांबद्दल क्षमा कर आणि आम्हाला नरकाग्नीपासून वाचव.’’ (3:16)
: हे लोक संयमी आहेत, सत्यनिष्ठ आहेत, आज्ञाधारक व दानशूर आहेत, आणि रात्रीच्या अंतिम प्रहरी अल्लाहजवळ क्षमायाचना करीत असतात. (3:17)
via Quran For All
http://tinyurl.com/quranforall
[8/3, 6:27 AM] JKA
*●●●●📖 कुरआन की आवाज 📖●●●●*
*"अल्लाह के नाम से जो बड़ा कृपालु और अत्यन्त दयावान हैं।"*
: कहो, "क्या मैं तुम्हें इनसे उत्तम चीज का पता दूँ?" जो लोग अल्लाह का डर रखेंगे उनके लिए उनके रब के पास बाग़ है, जिनके नीचे नहरें बह रहीं होगी। उनमें वे सदैव रहेंगे। वहाँ पाक-साफ़ जोड़े होंगे और अल्लाह की प्रसन्नता प्राप्त होगी। और अल्लाह अपने बन्दों पर नज़र रखता है (3:15)
: ये वे लोग है जो कहते है, "हमारे रब हम ईमान लाए है। अतः हमारे गुनाहों को क्षमा कर दे और हमें आग (जहन्नम) की यातना से बचा ले।" (3:16)
: ये लोग धैर्य से काम लेनेवाले, सत्यवान और अत्यन्त आज्ञाकारी है, ये ((अल्लाह के मार्ग में) खर्च करते और रात की अंतिम घड़ियों में क्षमा की प्रार्थनाएँ करते हैं (3:17).
[8/3, 6:28 AM] JAA
सशस्त्र जिहादसाठी अटी
सशस्त्र जिहाद मग तो बचावात्मक अथवा सकारात्मक असो स्वच्छंदपणे करता येत नाही. काही अटींअंतर्गतच त्यास परवानगी दिली आहे. अटींची पूर्तता केल्यानंतरच या जिहादला धर्ममान्यता असते. अटीविना याचे महत्त्व नाही. हा मुळात जिहादच नाही. अल्लाहची अप्रसन्नता या जिहादमुळे पदरी पडते.
सशस्त्र जिहादच्या अटी खालीलप्रमाणे आहेत.
१) स्वतंत्र आणि स्वावलंबी मुस्लिम व्यक्तीच या जिहादसाठी पात्र आहे आणि अमीरच्या (प्रमुख) नेतृत्वात जिहादला मान्यता आहे. सामाजिक व्यवस्थेशिवाय (शासनव्यवस्था) आणि प्रमुखाविना (अमीर) जिहाद अयोग्य आहे. बचावात्मक जिहादसाठीसुध्दा ही अट आहे. मक्का शहरात प्रेषित मुहम्मद (स.) यांचे वास्तव्य प्रारंभी असताना ही अट पूर्ण होत नव्हती म्हणून तर जिहादची परवानगी दिली गेली नाही. त्या काळी कुरैश समुदायाचे प्रेषित मुहम्मद (स.) आणि त्यांच्या अनुयायींवर अत्याचार परम सीमेला पोहचले होते आणि ते इस्लाम प्रचारकार्य गुप्तपणे करीत होते. त्यांनी मदीना शहरी स्थलांतर केल्यानंतर तेथे ते स्वतंत्रपणे आपले कार्य करीत होते आणि तेथे एक स्वतंत्र इस्लामी व्यवस्था स्थापित झाली होती, तेव्हाच जिहादची अनुमती दिली गेली. स्वतः प्रेषित तत्कालिन इस्लामी शासनव्यवस्थेचे अमीर (प्रमुख) होते. हीच परिस्थिती इतर प्रेषितांचीसुध्दा होती.
२) पुरेसे सैन्यबळ आणि सामरिकबळ उपलब्ध असणे आवश्यक आहे. शत्रुविरुध्द युध्द (सशस्त्र जिहाद) अन्यथा अयोग्य ठरते. कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘कुणावरही त्याच्या कुवतीपेक्षा जास्त ओझे टाकू नये.’’ (कुरआन २: २३५)
याच तत्त्वांवर कुरआनमध्ये दिव्यादेश आहे,
‘‘तुमच्या कुवतीप्रमाणे तुमच्यावरील अल्लाहचे कर्तव्य पार पाडत जा.’’ (कुरआन ४: १६)
३) जिहाद फक्त आणि फक्त अल्लाहसाठीच पाहिजे आणि त्याचा एकमेव उद्देश धर्माची सेवा करणे आणि अल्लाहची प्रशंसा आहे. जिहादीचा एकमेव उद्देश दुराचाराचे निराकरण आणि सदाचाराचा फैलाव करणे आहे. अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठीच जिहाद केला जातो. याव्यतिरिक्त दुसरा कोणताही उद्देश या पवित्र युध्दाचा नसावा. जेव्हा प्रेषित मुहम्मद (स.) यांना विचारले गेले की वेगवेगळ्या उद्देशाला समोर ठेवून लोक युध्द करीत आहेत. कोणी धनसंपत्तीसाठी, कोणी नावासाठी, कोणी देशासाठी, कुणाचे युध्द जिहाद आहे? यावर प्रेषितांनी उत्तर दिले,
‘‘जो अल्लाहच्या नावाचा महिमासाठी युध्द करतो त्याचेच युध्द हे अल्लाहसाठी असते.’’ (मुस्लिम, बुखारी)
दुसऱ्या एका प्रसंगी प्रेषित मुहम्मद (स.) यांना विचारण्यात आले की, ‘‘जर एखाद्याने अल्लाहसाठी संघर्ष करण्याचे ठरविले परंतु त्याबरोबर ऐहिक फायदे मिळण्याची इच्छासुध्दा आहे, तर अशासाठी आपले काय मत आहे?’’ प्रेषितांनी उत्तर दिले, ‘‘त्याला काहीही मोबदला मिळणार नाही.’’ (अबु दाऊद)
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी खालील तत्त्व मांडले,
‘‘जो कोणी आपली पूर्वग्रहदूषितता ठेवून संघर्ष करीत असेल तर तो आपल्यातला नाही. तसेच जर कोणी पूर्वग्रहदूषिततेसाठी मरण पावला तर तोसुध्दा आपल्यापैकी नाही.’’ (अबु दाऊद)
वरील दोन अटी या अगदी स्पष्ट आहेत परंतु तिसऱ्या अटीसंदर्भात थोडा खुलासा आवश्यक आहे. इस्लाममध्ये दुराचाराचा नायनाट करण्यासाठी जिहादची आवश्यकता सांगितली आहे. दुराचाराचा नायनाट आणि सदाचाराला प्रस्थापित करणे हा जिहादचा उद्देश आहे. अल्लाहची उपासना आणि सदाचाराचा फैलाव काय दुराचारी माणसांपासून अपेक्षित आहे की त्यासाठी संघर्ष ते करतील? कधीही नाही. या परिस्थितीत एक दुष्प्रवृत्तीचा अथवा दुराचारांचा नाश करून दुसरे दुराचार अथवा दुष्प्रवृत्ती पहिल्याची जागा घेईल. ही प्रवृत्ती इस्लामला लाभदायक मुळीच नाही तर ती हानीकारक आहे. ते इस्लामच्या नावाखाली हा दुष्प्रवृत्त खेळ खेळतील तर परिणामतः लोक इस्लामपासून दूर जातील.
[8/4, 3:07 AM] J
: السلام علیکم و رحمت اللہ !
" توبہ اور استغفار سے متعلق قرآنی آیات۔ "
ﻓَﺈِﺫَا ﻗَﺮَﺃْﺕَ ٱﻟْﻘُﺮْءَاﻥَ ﻓَﭑﺳْﺘَﻌِﺬْ ﺑِﭑﻟﻠَّﻪِ ﻣِﻦَ ٱﻟﺸَّﻴْﻄَٰﻦِ ٱﻟﺮَّﺟِﻴﻢ..
پھر جب تم قرآن پڑھنے لگو تو شیطان رجیم سے خدا کی پناہ مانگ لیا کرو ۔(سورتہ النحل ، آیت نمبر 98 )
ﺑِﺴْﻢِ ٱﻟﻠَّﻪِ ٱﻟﺮَّﺣْﻤَٰﻦِ ٱﻟﺮَّﺣِﻴﻢِ
اللہ کے نام سے جو رحمان و رحی
ﻗُﻞْ ﺇِﻧَّﻤَﺎٓ ﺃَﻧَﺎ۠ ﺑَﺸَﺮٌ ﻣِّﺜْﻠُﻜُﻢْ ﻳُﻮﺣَﻰٰٓ ﺇِﻟَﻰَّ ﺃَﻧَّﻤَﺎٓ ﺇِﻟَٰﻬُﻜُﻢْ ﺇِﻟَٰﻪٌ ﻭَٰﺣِﺪٌ ﻓَﭑﺳْﺘَﻘِﻴﻤُﻮٓا۟ ﺇِﻟَﻴْﻪِ ﻭَٱﺳْﺘَﻐْﻔِﺮُﻭﻩُ ۗ ﻭَﻭَﻳْﻞٌ ﻟِّﻠْﻤُﺸْﺮِﻛِﻴﻦَ
اے نبیؐ، اِن سے کہو، میں تو ایک بشر ہوں تم جیسا مجھے وحی کے ذریعہ سے بتایا جاتا ہے کہ تمہارا خدا تو بس ایک ہی خدا ہے، لہٰذا تم سیدھے اُسی کا رخ اختیار کرو اور اس سے معافی چاہو تباہی ہے اُن مشرکوں کے لیے (41:6)
ٱﻟَّﺬِﻳﻦَ ﻻَ ﻳُﺆْﺗُﻮﻥَ ٱﻟﺰَّﻛَﻮٰﺓَ ﻭَﻫُﻢ ﺑِﭑﻻْءَﺧِﺮَﺓِ ﻫُﻢْ ﻛَٰﻔِﺮُﻭﻥَ
جو زکوٰۃ نہیں دیتے اور آخرت کے منکر ہیں (41:7)
Tell them, (O Prophet): “I am only a human being like you. It is revealed to me that your God is One God; so direct yourselves straight to Him, and seek His forgiveness. Woe to those who associate others with Allah in His Divinity, (41:6)
who do not pay Zakah, and who deny the Hereafter. (41:7)
हे पैगंबर (स.), यांना सांगा, ’’मी तर एक मनुष्य आहे तुम्हासारखा. मला दिव्यबोधाद्वारे सांगण्यात येते की तुमचा उपास्य तर केवळ एकच उपास्य (अल्लाह) आहे, म्हणून तुम्ही सरळ त्याच्याकडेच रोख ठेवा, आणि त्याच्याकडे क्षमायाचना करा. विनाश आहे त्या अनेकेश्वरवाद्यांसाठी, (41:6)
जे जकात देत नाहीत आणि परलोकाचा इन्कार करणारे आहेत. (41:7)
कह दो, "मैं तो तुम्हीं जैसा मनुष्य हूँ। मेरी ओर प्रकाशना की जाती है कि तुम्हारा पूज्य-प्रभु बस अकेला पूज्य-प्रभु है। अतः तुम सीधे उसी का रुख करो और उसी से क्षमा-याचना करो - साझी ठहरानेवालों के लिए तो बड़ी तबाही है, (41:6)
जो ज़कात नहीं देते और वही है जो आख़िरत का इनकार करते है। - (41:7)
04 / 08 / 2017
[8/4, 5:39 AM] JKA

: मग काय ओढवेल त्यांच्यावर, जेव्हा आम्ही त्यांना त्या दिवशी एकत्र करू, ज्या दिवसाचे आगमन निश्चित आहे? त्या दिवशी प्रत्येक व्यक्तीला तिच्या कमाईचा बदला पुरेपूर दिला जाईल व कोणावरही अत्याचार होणार नाही. (3:25)
[8/4, 12:47 PM] JAA
: ईश्वरनिर्मित जीवनपद्धती
येथे ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की इस्लामची ही स्पष्ट जीवनपद्धती कुठल्याही आर्थिक कारणांचा अथवा परिस्थितीचा परिणाम नाही. तसेच त्याचे अस्तित्व भिन्न वर्गांच्या स्वार्थांनी बरबटलेल्या संघर्ष व कलहापासून उपजले नाही. ती एक ईश्वरनिर्मित आदर्श व्यवस्था आहे. ती अशा एका युगात मानवाला प्राप्त झाली, जेव्हा त्याच्या जीवनात आर्थिक बाबींना काही विशेष महत्त्व नव्हते. तसेच त्याला सामाजिक न्यायाचे वर्तमान अर्थ ठाऊक नव्हते. म्हणून माणसाच्या सामाजिक व आर्थिक बाबतीतील सुधारणेच्या दृष्टीने पाहिले तर इस्लामच्या तुलनेत कम्युनिझम तसेच भांडवलशाही हे दोन्ही फार नंतरच्या काळात निर्माण झाले. ऐतिहासिक दृष्टिकोनातून इस्लामला या दोहोंच्या तुलनेत प्रथमस्थान प्राप्त आहे.
जीवनातील मौलिक गरजा
उदाहरण म्हणून माणसाच्या जीवनातील मौलिक गरजाच घ्या. सामान्यपणे असे म्हटले जाते की कार्ल माक्र्सच पहिला माणूस होता ज्याने अन्न, निवारा व वासनांची तृप्ती या मौलिक गरजा आहेत असे म्हटले आणि सरकारचे हे अनिवार्य व बंधनकारक कर्तव्य म्हणून दाखविले की त्याने राष्ट्रातील सर्व व्यक्तींच्या गरजा एकत्र करुन त्यांची पूर्तता करावी. कार्ल माक्र्सच्या या विधानाला मानवी विचारामध्ये फार क्रांतिकारी समजले जाते. पण सत्य हे आहे की कार्ल माक्र्सच्या जन्माच्या १४ शतके आधी इस्लामद्वारा हे जग या क्रांतिपूर्ण विधानाशी चांगल्या तऱ्हेने परिचित होऊन चुकले होते. म्हणून या संदर्भात इस्लामचे प्रेषित मुहम्मद (स) यांनी असे उल्लेखित केले आहे की,
‘‘ज्या व्यक्ती आमचे (इस्लामी राज्याचे) कर्मचारी म्हणून कार्य करीत आहेत व त्यांना पत्नी नसेल तर त्यांचा विवाह केला जाईल, जर त्यांचे स्वतःचे घर नसेल तर त्यांना राहण्यासाठी घर दिले जाईल, जर चाकर नसतील तर त्यांना चाकर प्राप्त करुन दिले जातील व जर त्यांच्याकडे प्रवासाचे साधन म्हणून एखादे जनावर नसेल तर त्यांच्या प्रवासाची व्यवस्था केली जाईल.’’
त्यांच्या या ऐतिहासिक जाहीरनाम्यात केवळ सर्व मानवी मूळ अधिकारच आहेत असे नाही, ज्यांचे जाहीर निवेदन कार्ल माक्र्सने नंतरच्या काळात केले. अन्य बरेच काही त्यात सामील आहे. पण कम्युनिझमप्रमाणे इस्लाम त्याचे फळ, वर्गकलह, वर्गद्वेश व रक्तमय क्रांती आणि सर्व उच्च जीवनमूल्यांचा इन्कार करुन वसूल करीत नाहीत. ते अन्न, निवारा व वासनांची तृप्ती या मर्यादित क्षेत्रात कधीही बांधले जाऊ शकत नाही.
चिरकाल टिकणारी जीवनपद्धती
इस्लामी जीवनपद्धतीचे असे काही ठळक गुण आहेत. यावरुन ही गोष्ट चांगल्यारितीने स्पष्ट होते की धर्म म्हणून इस्लामला एका अशा विशाल, व्यापक व तर्कशुद्ध नियमांचे आणि सिद्धान्तांचे नामाभिदान दिले जाऊ शकते की मानवी जीवन आपल्या झगमगाटात व सुखवैभवात असूनसुद्धा त्याच्या स्पष्ट मर्यादा नजरेस पडतात व त्याचा कुठलाही भाग मग तो भावनेच्या जगाशी असो वा विचारांशी, कर्माशी, भक्तीशी, आर्थिक बाबी व सामाजिक सबंधाशी, नैसर्गिक प्रेरणांशी अथवा आध्यात्मिक आंदोलनाशी असो, त्याच्या पकडीपासून सुटत नाहीत. या अनेकविध पैलूंमध्ये समन्वय निर्माण करुन इस्लाम त्याला एक सुंदर, समतोल तसेच वैशिष्ट्यपूर्ण जीवनपद्धतीचे रुप प्रदान करतो. अशा प्रकारची सर्वव्यापी समतोल अथवा वैशिष्ट्यपूर्ण जीवनपद्धती, कोणत्याही काळात आपली उपयुक्तता हरवून, गमावून बसू शकते काय? माणूस खऱ्या अर्थाने याकडे दुर्लक्ष करु शकतो काय? कारण आपल्या उद्देशांच्या अथवा लक्ष्याच्या दृष्टीने हे स्वतःच जीवनपर्याय आहेत किबहुना स्वयंजीवनच आहे. म्हणून जोवर या धरतीवर जीवमात्र आढळेल तोवर ही पद्धतीही अस्तित्वात असेल व टिकून राहील आणि सतत आढळणारे त्याचे अक्षय ठसे कधीही पुसले जाऊ शकत नाहीत.
आजच्या युगाची गरज
आज जी अवस्था आढळते व या वेळी ज्या ज्या समस्या आहेत ते पाहिल्यानंतर कोणताही बुद्धिमान माणूस असे माणने कठीण आहे की आजचा माणूस एखाद्या बौद्धिक आधारावर इस्लामशी विन्मुख होऊ शकतो व त्याने सादर केलेल्या जीवनपद्धतीशी दुर्लक्ष करुन तिची उपेक्षा करु शकतो. आज २१ व्या शतकातही मानवता तशाच प्रकारच्या सर्व दोषांमध्ये बरबटलेली आहे जशी ती मानवाच्या रानटी अवस्थेमध्ये होती. प्रगतीचा, प्रकाशाचा ध्यास ठरलेल्या या युगामध्ये मानवता, वंशद्वेष, वर्णद्वेष याच्या अत्यंत तिरस्करणीय अवस्थेत आहे. उदाहरण पाहिजे असेल तर अमेरिका व दक्षिण आफ्रिका या देशांवरच एक दृष्टी टाका. नैतिक, सदाचार, सुसंस्कार व मानवतेच्या बाबतीत या २१ व्या शतकातील माणसाला, अजून इस्लामपासून फार काही शिकण्यासारखे आहे. इस्लामने मानवतेला सर्व प्रकारच्या वांशिक संकुचित दृष्टिकोनातून मुक्त केले, त्याला आज बराच काळ लोटला आहे. आजसुद्धा इस्लामच जगाला या द्वेष व तिरस्काररुपी दलदलीतून बाहेर काढू शकतो. कारण इस्लाम मानवाच्या समानतेची एक सुंदर प्रतिमाच सादर करीत नाही तर व्यवहारी जगातही तो एक अशी समानता निर्माण करु दाखवून चुकला आहे, ज्यासारखे जगाच्या इतिहासात दुसरे कोणतेही उदाहरण आढळत नाही. इस्लामच्या या आदर्शकाळांत कोणत्याही काळ्या माणसाला गोऱ्या माणसावर, वर्ण अथवा वंशाच्या आधारावर कसलेही प्रभुत्व नव्हते. इस्लाम जवळ प्रमुखता व श्रेष्ठत्व यांचे एकमात्र साधन म्हणजे मानवाचा चांगुलपणा व त्याचा सदाचार आहे. म्हणूनच इस्लामने गुलामांना गुलामीच्या दैन्यावस्थेपासून मुक्ती प्राप्त करून दिली व त्यांना प्रगती व सुखांचा व्यापक संभवांची सूचनाही देऊन टाकली, येथपर्यंत की गुलामांना राष्ट्राध्यक्षपदावर बसविण्याचे अधिकारही स्वीकारण्यात आले. प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले,
‘आपल्या अमीराचे (अध्यक्षाचे) म्हणणे ऐकून घ्या व त्यांचे आज्ञापालन करा. मग हा अमीर निग्रो गुलाम जरी असला तरी त्याच्या आज्ञेचे पालन करा जोवर तो तुम्हाला ‘अल्लाह’च्या शरीअतीनुसार नेत आहे.’
नागरी स्वातंत्र्याचा आदर
आणखी एका दृष्टिकोनातूनही इस्लामच्या गरजेकडे आजचे जग अनास्था दाखवू शकत नाही, साम्राज्यवाद व हुकूमशाहीच्या हाताने आजची मानवता जे कष्ट, क्लेश व दुःख भोगीत आहे ज्या रानटीपणाचे व क्रोर्याचे भक्ष्य बनले आहे त्या पासून वाचण्याचा, सुटकेचा, इस्लामखेरीज दूसरा कुठलाही मार्ग दृष्टीस पडत नाही. इस्लामच मानवतेला साम्राज्यवाद व हुकूमशाहीच्या शापापासून सुटका करून देऊ शकतो, कारण तो साम्राज्यवाद व साम्राज्यवादी शोषणांचा अत्यंत विरोध करणारा आहे. आपल्या उत्कर्षकालामध्ये मुस्लिमांचे इतर राष्ट्रांशी व्यवहार इतके औदार्यपूर्ण, श्रेष्ठ व सभ्यतापूर्ण होते की आजच्या युरोपाची संकुचित दृष्टीसुद्धा त्याची उंच भरारी पाहू शकते.
या संदर्भात आदरणीय उमर बिन खत्ताब (र) यांनी न्यायदानात केलेल्या एका सुप्रसिद्ध निवाड्याचे उदाहरण सादर केले जाऊ शकते. या प्रकरणात एका इजिप्शियन आदिवासीला विनाकारण मारहाण करण्याच्या व छळ करण्याच्या आरोपावरुन ज्याने इजिप्त जिकले होते, तो प्रसिद्ध विजेता व प्रतिष्ठित गव्हर्नर आदरणीय अमर बिन आस (र) यांच्या चिरंजीवाला फटक्यांची शिक्षा दिली होती, किबहूना त्याच्या बापालाही अशी शिक्षा देण्यास तयार झाले होते. या एका उदाहरणावरुन हे सहज अनुमान केले जाऊ शकते की इस्लामी राज्यात नागरिकांना किती मोठ्या प्रमाणात नागरी स्वातंत्र्य होते.
आज भांडवलशाही पद्धतीचा जो शाप जगावर पसलरेला आहे, ज्यामुळे सारे जीवन विषारी बनले आहे; त्यापासून सुटकेचा मार्गही इस्लामखेरीज अन्य कुठलाही नाही. व्याज घेणे, नफाखोरी हा भांडवलशाही पद्धतीचा पाया असून इस्लाम या दोहोंचा अत्यंत तीव्र विरोध करतो व त्यांना वर्ज्य घोषित करतो. दुसऱ्या शब्दांत याचा अर्थ असा की आजच्या जगात भांडवलशाहीने निर्माण केलेले अनुभव व दोष फक्त इस्लामच दूर करु शकतो.
याचप्रमाणे भौतिकवादी व नास्तिकवादी साम्यवादाचे उच्छेदनही केवळ इस्लामच्या हस्तेच संभवनीय आहे. कारण इस्लाम केवळ पूर्ण सामाजिक न्याय स्थापन करुन त्याला टिकवून धरतो, तेवढेच तो उच्च मानवी तसेच आध्यात्मिक मूल्यांचे रक्षणही करतो. कारण तो साम्यवादाप्रमाणे कसल्याही प्रकारच्या संकुचित दृष्टीस बळी बनलेला नाही व त्याचे जग ज्ञानेंद्रियांनी जाणवणाऱ्या वस्तूपर्यंतच मर्यादित नाही. आपल्यात हे सर्व गुण असूनसुद्धा, इस्लाम आपली कुठलीही गोष्ट जबरदस्तीने लादून त्याला ती मानण्यास भाग पाडीत नाही. कारण धर्माच्या व श्रद्धेच्या बाबतीत तो आरंभीपासूनच कसल्याही जबरदस्तीशी सहमत नाही व मानत नाही. याबाबतीत त्याचा नियम असा आहे की -
‘‘धर्माच्या बाबतीत कसलीही जुलूम-जबरदस्ती नाही. सत्य गोष्ट चुकीच्या विचारापासून वेगळी काढून ठेवली गेली आहे.’’ (२:२५६)
या वेळी जगावर तिसऱ्या विश्वयुद्धाचे अंधकारपूर्ण ढग पसरलेले आहेत, ते दूर होण्यासाठीही इस्लामरुपी सूर्योदय होण्याखेरीज अन्य कुठलाही मार्ग दिसत नाही. पण हे त्याचवेळी शक्य आहे जेव्हा मानवजात इस्लामला आपल्या जीवनाचा मार्गदर्शक बनवून खऱ्या सुखशांतीच्या या मार्गाचा अंगीकार करण्यास तयार होईल.
तात्पर्य असे की इस्लामचा काळ संपलेला नसून तो आता सुरु झाला आहे. हा कुठलाही मृत दृष्टिकोन नसून ही क्रांतीपूर्ण जीवनपद्धती आहे. याचा भविष्यकाल तेवढाच उज्वल आहे जितका त्याचा भूतकाल वैभवशाली होता व युरोप त्या वेळी इतिहासाच्या काळोखात कालखंडात धडपडत, चाचपडत होता.
[8/5, 5:43 AM] JKA

★: हे नबी! लोकांना माहिती करून द्या की, तुमच्या मनात जे काही आहे त्याला गुप्त ठेवा अथवा प्रकट करा प्रत्येक स्थितीत अल्लाह ते जाणतो, पृथ्वी व आकाशामधील कोणतीही वस्तू त्याच्या ज्ञानकक्षेबाहेर नाही आणि त्याची सत्ता प्रत्येक वस्तूवर प्रभावी आहे. (3:29)
★: तो दिवस उगवणार आहे, जेव्हा प्रत्येक सजीवाला आपल्या कृतीचे फळ उपलब्ध असल्याचे आढळेल मग त्याने पुण्य केले असो अथवा पाप, त्या दिवशी मनुष्य अशी कामना करील की, किती छान झाले असते, जर हा दिवस अद्याप त्याच्यापासून फार दूर असता! अल्लाह तुम्हाला आपल्या स्वतःचे भय दाखवतो आणि तो आपल्या दासांचा अत्यंत हितचिंतक आहे. (3:30)
😴
[8/5, 6:10 AM] JAA:
इष्ट मंगलमय वचन; कल्म-ए-तैय्यबा
ज्यांवर इस्लामचा पाया आधारलेला आहे. त्या पाचही श्रद्धांचे विवरण या एका वचनातच सामावलेले आहे ते वचन म्हणजे,‘‘ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर्रसूलुल्लाह’’ (अल्लाहखेरीज कोणीही आज्ञापालनास व उपासनेस पात्र नाही. मुहम्मद (स.) हे अल्लाहचे प्रेषित आहेत.)मुखातून जेव्हा तुम्ही ‘लाइलाहा इल्लल्लाह’ उच्चारता तेव्हा एकूण सर्व खोट्या उपास्यांचा व नियंत्यांचा त्याग करून केवळ एकाच अल्लाहचे दास्यत्व पत्करल्याचा तुम्ही कबुलीजबाब देत असता. तसेच तुम्ही ‘मुहम्मदुर्रसूलुल्लाह’ म्हणता तेव्हा आदरणीय मुहम्मद (स.) हे अल्लाहचे प्रेषित आहेत, या गोष्टीच्या सत्यतेबद्दल तुम्ही कबुली देत असता. प्रेषित्वाची कबुली दिल्यानंतर ही गोष्ट तुम्हांवर आपोआपच अनिवार्य ठरते की, तुम्ही ईशत्वासंबंधी ईशसत्ता व ईश्वराच्या गुणवत्तेसंबंधी, त्याच्या ‘फरिश्त्या’ (दूता) संबंधी, ईश्वरी ग्रंथासंबंधी, ईश्वराच्या सर्व प्रेषितांसंबंधी, तसेच ‘आखिरत’ (पारलौकिक जीवन) संबंधी, जी शिकवण मुहम्मद (स.) यांनी दिलेली आहे, त्यावर अंतःकरणापासून व निष्ठापूर्वक श्रद्धा (ईमान) बाळगावी. अल्लाहच्या आज्ञांचे पालन करण्याची व उपासनेची जी पद्धत त्यांनी दाखवून दिली त्यानुसार आचरण करावे, हे तुम्हावर अनिवार्य ठरते.(१)१) सूरह अल बकरा, आयत २८५, सूरह अन निसा आयत १३६ आधारित आहेत. यात शंका नाही की ‘हदीस’ मध्ये ‘तकदीर’ला सुद्धा श्रद्धेत (ईसान) सामील केले आहे आणि अशा प्रकारे मौलिक श्रद्धा पाचऐवजी सहा होतात. खरे तर ‘तकदीर’वर ईमान धारण करणे अल्लाहवर ईमानधारण करण्याचाच भाग आहे आणि कुरआनमध्ये याचा उल्लेख याचसाठी आला आहे. म्हणून या धारणेला मी एकेश्वरत्वाच्या व्याख्येतच समाविष्ट केले आहे. याच प्रकारे हदीसमध्ये जन्नत, जहन्नुम, सिरात व मिजानला वेगवेगळ्या धारणा म्हणून उल्लेखले आहे. खरे तर हे सर्व ‘आखिरत’वर ईमान धारण करण्याचाच भाग आहे.
[8/5, 6:21 AM] JKA
: *●●●●📖 कुरआन की आवाज 📖●●●●*

★: कह दो, "यदि तुम अपने दिलों की बात छिपाओ या उसे प्रकट करो, प्रत्येक दशा में अल्लाह उसे जान लेगा। और वह उसे भी जानता है, जो कुछ आकाशों में है और जो कुछ धरती में है। और अल्लाह को हर चीज़ की सामर्थ्य प्राप्त है।" (3:29)
★: जिस दिन प्रत्येक व्यक्ति अपनी की हुई भलाई और अपनी की हुई बुराई को सामने मौजूद पाएगा, वह कामना करेगा कि काश! उसके और उस दिन के बीच बहुत दूर का फ़ासला होता। और अल्लाह तुम्हें अपना भय दिलाता है, और वह अपने बन्दों के लिए अत्यन्त करुणामय है (3:30)
[8/6, 5:40 AM] JKA

★: हे पैगंबर (स.)! लोकांना सांगून टाका, ’’जर तुम्ही खरोखर अल्लाहवर प्रेम करीत असाल, तर माझे अनुकरण करा, अल्लाह तुमच्यावर प्रेम करील आणि तुमच्या अपराधांना क्षमा करील, तो अत्यंत क्षमाशील व परम कृपाळू आहे.’’ (3:31)
★: त्यांना सांगा! ’’अल्लाह व पैगंबरांचे आज्ञाधारक बना.’’ मग जर त्यांनी तुमचे आवाहन स्वीकारले नाही तर अल्लाह अवज्ञा करणार्यांवर प्रेम करत नाही.’’ (3:32)
[8/6, 5:45 AM] JKA

★: कह दो, "यदि तुम अल्लाह से प्रेम करते हो तो मेरा अनुसरण करो, अल्लाह भी तुमसे प्रेम करेगा और तुम्हारे गुनाहों को क्षमा कर देगा। अल्लाह बड़ा क्षमाशील, दयावान है।" (3:31)
★: कह दो, "अल्लाह और रसूल का आज्ञापालन करो।" फिर यदि वे मुँह मोड़े तो अल्लाह भी इनकार करनेवालों से प्रेम नहीं करता (3:32)
[8/6, 7:35 AM] JKA
काबागृहाचे महत्त्व
प्रथमतः आपण काबागृहाच्या बांधकामाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि त्याचे महत्त्व पाहू या. पितापुत्र (इब्राहीम व इस्माईल) काबागृहाचे बांधकाम उभारीत होते व प्रार्थ ना करीत होते,
‘‘हे आमच्या पालनकर्त्या प्रभू! आमच्याकडून या सेवेचा स्वीकार कर. तू सर्वांचे ऐकणारा आणि सर्व काही जाणणारा आहेस. हे प्रभू आम्हा दोघांना तुझे आज्ञाधारक बनव. आमच्या वंशामधून असा समाज घडव, जो तुझाच आज्ञाधारक झालेला असेल. आम्हाला आमच्या उपासनेचा विधी सांग आणि आमच्या उणिवांकडे दुर्लक्ष कर. निःसंशय तू क्षमावंत आणि दयावंत आहेस.’’ (कुरआन २: १२७-१२८)
पितापुत्राच्या वरील प्रार्थनेवरून हेच सिध्द होते की काबागृह बांधण्याचा जो मूळ हेतु होता तो साध्य करण्यासाठी त्यांच्या वंशामधूनच तो समाज उभा राहिला जो आज्ञाधारक (मुस्लिम) होता.
येथे हे स्पष्ट केले पाहिजे की त्यांच्या प्रार्थनेत त्यांनी विनवणी केली होती,
‘‘आमच्या वंशामधून असा समाज घडव जो तुझाच आज्ञाधारक झालेला असेल.’’
येथे मुस्लिम हा शब्द वापरण्यात आलेला आहे. मुस्लिम या शब्दाचा अर्थ होतो आज्ञाधारक.
काबागृहाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर इब्राहीम (अ.) यांनी आपल्या पुत्राला आणि पत्नीला इतरत्र स्थलांतरित केले नाही. ते तेथेच स्थायिक झाले, जो वाळवंटी, ओसाड प्रदेश होता व तो निर्मनुष्य प्रदेश होता. काबागृहाजवळ त्यामुळे त्यांची जी वंशावळ जन्माला येणार होती ती सर्व ‘‘त्या एक अल्लाहचेच आज्ञाधारक असतील.’’ इब्राहीम (अ.) यनी स्वतः अल्लाहजवळ त्यावेळी प्रार्थना केली,
‘‘हे पालनकर्त्या प्रभू! मी एका निर्जल व ओसाड खोऱ्यात आपल्या संततीच्या एका भागास तुझ्या आदरणीय घराजवळ आणून वसविले आहे. हे पालनकर्त्या प्रभू! असे मी अशासाठी केले आहे की या लोकांनी येथे नमाज कायम करावी.’’ (कुरआन १४: ३७)
‘‘या लोकांनी येथे नमाज कायम करावी’’ याचा अर्थ असा आहे की त्यांनी अल्लाहची सेवा (इबादत-उपासना) करावी. अल्लाहचा धर्म पाळावा आणि त्याचा प्रसार करावा. प्रार्थना श्रध्दाशीलतेचे अनिवार्य अंग आहे. म्हणून ‘‘लोकांनी नमाज कायम करावी’’ याचा अर्थच असा होतो की इस्लाम धर्म (आज्ञाधारकता) पूर्णरूपेन प्रस्थापित केला जावा. अल्लाहच्या आज्ञाधारकतेचा (इस्लाम) एक आदर्श त्यांच्या वंशात प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या हस्ते त्या ठिकाणी प्रस्थापित झाला याची साक्ष इतिहास देत आहे.
त्यांच्या वंशातून पुढे आज्ञाधारक समाज कसा बनणार होता? अल्लाहच्या आज्ञाधारकतेच्या पध्दती त्यांना कशा प्रकारे माहीत होणार? यासाठी त्या पितापुत्रांनी अल्लाहजवळ अशी विनवणी केली होती,
‘‘हे पालनकर्त्या प्रभू! या लोकांमध्ये ह्यांच्यातील एक प्रेषित उभा कर. जो तुझे संदेश यांना ऐकवील आणि यांना ग्रंथ आणि विवेकाची शिकवण देऊन ह्यांचे जीवन पवित्र करील. तूच प्रभूत्वशाली न्याय करणारा आहेस.’’ (कुरआन २: १२९)
मानवी इतिहासातील या दोन प्रार्थना आहेत ज्यांचा स्वीकार अल्लाहने कालांतराने (सुमारे २००० वर्षानंतर) केला. आदरणीय मुहम्मद (स.) यांच्या रूपात ‘प्रेषित’ आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या (सहाबी) रूपात ‘आज्ञाधारक समाज’ उभा केला. (इस्लामी राष्ट्र निर्माण केले.) हा आज्ञाधारक समाज म्हणजेच मुस्लिम समाज आणि मुस्लिम राष्ट्र होय. त्यांचे नाव मुस्लिम (आज्ञाधारक) यासाठी झाले की इब्राहीम (अ.) यांनी त्यांचा उल्लेख आपल्या प्रार्थनेत याच मुस्लिम शब्दाने केलेला होता. अशा प्रकारे इब्राहीम (अ.) यांनी मुहम्मद (स.) आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मुस्लिम हे नाव अगोदरच दिले होते. हे कुरआनच्या ‘हज्ज’ या अध्यायाने सिध्द केले आहे.
वरील विवेचनाने हे सिध्द होते की काबागृहाला इस्लामचे प्रेरणास्रोत आणि केंद्र संबोधने अगदी योग्य आहे.
[8/7, 3:50 AM]

اللہ کے نام سے جو رحمان و رحیم ہے
ﻭَﻭَﺻَّﻴْﻨَﺎ ٱﻹِْﻧﺴَٰﻦَ ﺑِﻮَٰﻟِﺪَﻳْﻪِ ﺇِﺣْﺴَٰﻨًﺎ ۖ ﺣَﻤَﻠَﺘْﻪُ ﺃُﻣُّﻪُۥ ﻛُﺮْﻫًﺎ ﻭَﻭَﺿَﻌَﺘْﻪُ ﻛُﺮْﻫًﺎ ۖ ﻭَﺣَﻤْﻠُﻪُۥ ﻭَﻓِﺼَٰﻠُﻪُۥ ﺛَﻠَٰﺜُﻮﻥَ ﺷَﻬْﺮًا ۚ ﺣَﺘَّﻰٰٓ ﺇِﺫَا ﺑَﻠَﻎَ ﺃَﺷُﺪَّﻩُۥ ﻭَﺑَﻠَﻎَ ﺃَﺭْﺑَﻌِﻴﻦَ ﺳَﻨَﺔً ﻗَﺎﻝَ ﺭَﺏِّ ﺃَﻭْﺯِﻋْﻨِﻰٓ ﺃَﻥْ ﺃَﺷْﻜُﺮَ ﻧِﻌْﻤَﺘَﻚَ ٱﻟَّﺘِﻰٓ ﺃَﻧْﻌَﻤْﺖَ ﻋَﻠَﻰَّ ﻭَﻋَﻠَﻰٰ ﻭَٰﻟِﺪَﻯَّ ﻭَﺃَﻥْ ﺃَﻋْﻤَﻞَ ﺻَٰﻠِﺤًﺎ ﺗَﺮْﺿَﻰٰﻩُ ﻭَﺃَﺻْﻠِﺢْ ﻟِﻰ ﻓِﻰ ﺫُﺭِّﻳَّﺘِﻰٓ ۖ ﺇِﻧِّﻰ ﺗُﺒْﺖُ ﺇِﻟَﻴْﻚَ ﻭَﺇِﻧِّﻰ ﻣِﻦَ ٱﻟْﻤُﺴْﻠِﻤِﻴﻦَ
ہم نے انسان کو ہدایت کی کہ وہ اپنے والدین کے ساتھ نیک بر تاؤ کرے اُس کی ماں نے مشقت اٹھا کر اسے پیٹ میں رکھا اور مشقت اٹھا کر ہی اس کو جنا، اور اس کے حمل اور دودھ چھڑانے میں تیس مہینے لگ گئے یہاں تک کہ جب وہ اپنی پوری طاقت کو پہنچا اور چالیس سال کا ہو گیا تو اس نے کہا "اے میرے رب، مجھے توفیق دے کہ میں تیری اُن نعمتوں کا شکر ادا کروں جو تو نے مجھے اور میرے والدین کو عطا فرمائیں، اور ایسا نیک عمل کروں جس سے تو راضی ہو، اور میری اولاد کو بھی نیک بنا کر مجھے سُکھ دے، میں تیرے حضور توبہ کرتا ہوں اور تابع فرمان (مسلم) بندوں میں سے ہوں" (46:15)
We have enjoined man to be kind to his parents. In pain did his mother bear him and in pain did she give birth to him. The carrying of the child to his weaning is a period of thirty months. And when he is grown to full maturity and reaches the age of forty, he prays: “My Lord, dispose me that I may give thanks for the bounty that You have bestowed upon me and my parents, and dispose me that I may do righteous deeds that would please You, and also make my descendants righteous. I repent to You, and I am one of those who surrender themselves to You.” (46:15)
आम्ही मनुष्याला आदेश दिला की त्याने आपल्या आईवडिलांशी सद्व्यवहार करावा, त्याच्या आईने कष्ट सोसून त्याला पोटात बाळगले आणि कष्ट करून त्याला प्रसवले, आणि त्याचा गर्भ व त्याचे दूध सोडविण्यात तीस महिने लागले येथपावेतो की तो जेव्हा आपल्या पूर्ण शक्तीला पोहचला आणि चाळीस वर्षांचा झाला तेव्हा तो म्हणाला, ’’हे माझ्या पालनकर्त्या, मला सद्बुद्धी दे की मी तुझ्या त्या देणग्यांबद्दल कृतज्ञता दर्शवावी ज्या तू मला व माझ्या आईवडिलांना प्रदान केल्या आणि असे सत्कृत्य करावे ज्याने तू प्रसन्न व्हावे, आणि माझ्या संततीलासुद्धा सदाचारी बनवून मला सुख दे. मी तुझ्या पुढे पश्चात्ताप व्यक्त करतो आणि आज्ञाधारक (मुस्लिम) दासांपैकी आहे.’’ (46:15)
हमने मनुष्य को अपने माँ-बाप के साथ अच्छा व्यवहार करने की ताकीद की। उसकी माँ ने उसे (पेट में) तकलीफ़ के साथ उठाए रखा और उसे जना भी तकलीफ़ के साथ। और उसके गर्भ की अवस्था में रहने और दूध छुड़ाने की अवधि तीस माह है, यहाँ तक कि जब वह अपनी पूरी शक्ति को पहुँचा और चालीस वर्ष का हुआ तो उसने कहा, "ऐ मेरे रब! मुझे सम्भाल कि मैं तेरी उस अनुकम्पा के प्रति कृतज्ञता दिखाऊँ, जो तुने मुझपर और मेरे माँ-बाप पर की है। और यह कि मैं ऐसा अच्छा कर्म करूँ जो तुझे प्रिय हो और मेरे लिए मेरी संतति में भलाई रख दे। मैं तेरे आगे तौबा करता हूँ औऱ मैं मुस्लिम (आज्ञाकारी) हूँ।" (46:15)
07 / 08 / 2017
[8/7, 7:23 AM] JKA
*●●●●📖 कुरआन की आवाज📖●●●●*
"अल्लाह के नाम से जो बड़ा कृपालु और अत्यन्त दयावान हैं।"
"जो इस्लाम के अतिरिक्त कोई और दीन (धर्म) तलब करेगा तो उसकी ओर से कुछ भी स्वीकार न किया जाएगा। और आख़िरत में वह घाटा उठानेवालों में से होगा "(3:85)
"अल्लाह उन लोगों को कैसे मार्ग दिखाएगा, जिन्होंने अपने ईमान के पश्चात अधर्म और इनकार की नीति अपनाई, जबकि वे स्वयं इस बात की गवाही दे चुके हैं कि यह रसूल सच्चा है और उनके पास स्पष्ट निशानियाँ भी आ चुकी हैं? अल्लाह अत्याचारी लोगों को मार्ग नहीं दिखाया करता "(3:86)
"उन लोगों का बदला यही है कि उनपर अल्लाह और फ़रिश्तों और सारे मनुष्यों की लानत है" (3:87)
( सूरह आलिइमरान )
[8/7, 8:18 AM] JAA
: नातेवाईकांशी सद्व्यवहाराची आज्ञा
पवित्र कुरआनात वारं-वार आदेश दिला गेला आहे की, नातेवाईकांचे अधिकार आणि हक्क अदा केले जावेत. सांगितेल गेले,
‘‘आणि नातेवाईकांचे हक्क अदा करा.’’ (कुरआन १७-२६)
हिच गोष्ट सूरह १६ (नहल) आयत ९० मध्ये आहे.
अर्थात अल्लाहचा आदेश आहे की, नातेवाईकांचा हक्क अदा करा. हे हक्क व अधिकार परिस्थितीच्या दृष्टीने वैधानिक आणि नैतिक दोन्ही प्रकारांचे आहेत.
आप्तसंबंधी (नातेवाईक) आणि कुटंबातील लोक लांबचे असोत अथवा जवळचे, त्यांच्याशी सद्व्यवहार, सहानुभूती आणि शुभचितनाचा व्यवहार अवलंबविला जाईल आणि त्यांच्या सुख-दुःखात सहभाग घेतला जाईल. अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स) यांनी ज्या गोष्टींची शिकवण दिली त्या गोष्टींमध्ये ही गोष्ट सुद्धा सम्मिल्लीत (सामील) आहे.
‘‘आई-वडिलांशी चांगला व्यवहार करा आणि नातेवाईकांशी......’’ (कुरआन २-८३)
आप्तस्वकियांशी (नातेवाईकांशी) केला जाणारा हा ‘सद्व्यवहार’ यास इस्लामी परिभाषेत ‘‘सिलारहमी’’ शब्दाने अभिव्यक्त केले जात असते.
आप्तस्वकीयांशी (नातेवाईकांशी) अत्यंत चांगला व्यवहार करणार्यांची प्रशंसा केली गेली आहे.
पवित्र कुरआनत आहे,
‘‘ते जोडतात त्या संबंधांना (नात्यांना) ज्यांना जोडण्याचा अल्लाहने आदेश दिला आहे आणि आपल्या पालनहार अल्लाहचे भय बाळगतात.’’ (कुरआन १३-२१)
वास्तवात इस्लाम हे इच्छितो की समाजाचा प्रत्येक तो व्यक्ति ज्याची भौतिक दृष्टया व आर्थिक दृष्टीने चांगली परिस्थिती आहे तो कुटूंबाचा तथा परिवाराच्या त्या लोकांची सहायता करेल जे गरजू (मोहताज) आहेत आणि त्यांना या योग्य बनवावे की जीवनाच्या व्यवहारात (व्यापार-विनिमयात) ते आपले कर्तव्य पूर्ण करू शकावेत.
[8/8, 6:40 AM] Ji asre ahmd: इस्लाममध्ये अनाथ आणि विधवांचे अधिकार
अनाथ मुलांच्या पालनपोषण आणि शिक्षण-प्रशिक्षणाची सर्वस्वी जवाबदारी ही समाजावरच असते. इस्लामने त्यांच्याप्रति आपले काय कर्तव्य आहेत, ते कुरआनात अशाप्रकारे स्पष्ट केले आहेत.
1. ‘‘त्यांच्याशी चांगला व्यवहार करावा.‘‘(संदर्भ : सूरह-ए-निसा - ३६)2. ‘‘त्यांच्या भल्यासाठी आपली संपत्ती खर्च करावी.‘‘(संदर्भ : सूरह-ए-बकरा - २१५)3. ‘‘त्यांना कोणत्याही गोष्टीवर झिडकारु नये.‘‘(संदर्भ : सूरह-ए-जुहा - ९)4. ‘‘त्यांच्या संपत्तीचे रक्षण करावे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-अनआम - १५२)5. ‘‘त्यांच्याशी न्यायाचे वर्तन करावे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-निसा - १२७)6. ‘‘त्यांच्याशी असा व्यवहार करावा, जसा आपण आपल्या पोटच्या मुलाशी करतो.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी)
आज अख्ख्या जगामध्ये कोट्यवधी मुले अशी आहेत, जे आपल्या माता-पित्यांपासून दूर, बेवारशीप्रमाणे जीवन जगत आहेत, गलिच्छ वस्त्यांमध्ये खडतर जीवन कंठित आहेत, अपराधी वृत्तींना बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत इस्लामी शिकवणीचा अंगीकार केल्यास ही समस्या अगदी चुटकीसरशी सुटेल.
ज्याप्रमाणे अनाथ हा समाजाचा अत्यंत दुर्बल घटक असून समाजाच्या सहकार्य आणि स्नेह व प्रेमास पात्र आहे, त्याचप्रमाणे विधवा स्त्रियांसुद्धा समाजाचा अत्यंत दुर्बल घटक असून सर्व समाजाच्या मदतीस पात्र आहे. आजही आपण पाहतो की, इस्लामेतर विभिन्न समाज आणि धर्मांमध्ये विधवा स्त्रियांची कशी अवहेलना होते, तिला किती तुच्छ लेखण्यात येते, विधवा असल्याने तिच्या विवशतेचा गैरफायदा उचलून तिचे कसे आर्थिक, शारीरिक आणि लैंगिक शोषण करण्यात येते. बर्याच ठिकाणी तिचा जगण्याचा व आनंदी वातावरणात वावरण्याचा अधिकार हिरावून घेण्यात आला आहे, तिच्याविषयी अनिष्ट आणि शापित कल्पना व विचारसरणी समाजात पेरण्यात आल्या आहेत, तिला समाजजीवनापासून कलंकिनी व शापिनी म्हणून विभक्त करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर तिच्यावर अत्याचाराची यापेक्षा आणखीन गंभीर आणि दुर्दैवी अवस्था काय असू शकते की तिला पतीच्या चितेवर जीवंत जाळून टाकण्यात यावे. मात्र इस्लामने त्या सर्व जुलमी व अत्याचारी जोखडांतून तिला मुक्त केले आणि सन्मानाने जगण्याचा हक्क प्रदान केला. शिवाय तिच्यावर कृपाफळांचा आणि सहकार्य व सहानुभूतीचा वर्षाव करून तिला मान-सन्मान दिला. तिचा नितांत आदर केला. इतरांप्रमाणेच दुसरा विवाह करण्याचा, दांपत्यिक जीवन सुखासमाधानाने व्यतीत करण्याचा, पतीच्या वारसासंपत्तीत भागीदारी होण्याचा परिपूर्ण हक्क दिला आणि मानवजातीस इस्लामने सडेतोडपणे बजावले की, त्यांच्या अधिकारांत कुचराई करणे हा घोर आणि शिक्षापात्र अपराध आहे. शिवाय त्यांना सहकार्य करण्याबाबतीत प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे,
‘‘अनाथ आणि विधवांच्या कल्याणासाठी प्रयत्न करणे हे धर्मयुद्ध करण्यासम आणि दिवसभर रोजा(उपवास) ठेवून रात्रभर नमाज पढण्यासम पुण्य कर्म आहे.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी).

Comments
Post a Comment